उदगीर येथील विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण
*उदगीर* : उदगीर येथे बांधण्यात आलेल्या विविध विकास कामांच्या लोकार्पण समारंभास देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण देण्यात आले आहे. लवकरच हा सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी दिली.
मराठवाड्यातील अतिशय सुंदर व भव्य असे बौद्ध विहार लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे बांधण्यात आले असून कर्नाटक राज्यातील गुलबर्गा शहराच्या धर्तीवर हे बौध्द विहार उभारले आहे. जवळपास साडेचार एकर मध्ये या विहाराची उभारणी करण्यात आली असून हे मराठवाड्यातील सर्वात भव्य - दिव्य असे बौद्ध विहार आहे. तसेच नविन बांधण्यात आलेल्या तहसील कार्यालयाची इमारत, पंचायत समिती कार्यालय इमारत, प्रशासकीय इमारत, शादी खाना, वीरशैव लिंगायत भवन, तिरु बॅरेजेस आणि जळकोट येथील प्रशासकीय इमारत, शासकीय विश्रामगृह इमारत अशा विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी देशाच्या राष्ट्रपती महोदया महामहीम द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण देण्यात आले असून लवकरच हा सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.
0 Comments