Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

धंदा टाकण्यासाठी दिड लाखासाठी विवाहितेचा छळ...

धंदा टाकण्यासाठी दिड लाखासाठी विवाहितेचा छळ...

सासरच्या ५ जणांविरुद्ध उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा..

उदगीर : प्रतिनिधी
उदगीर शहरातील फुलारी गल्ली रोकडे हनुमान नगर येथील विवाहितेला धंदा टाकण्यासाठी माहेरहून १ लाख ५० हजार रुपये घेऊन ये म्हणून मानसिक व शारीरिक छळ केल्या प्रकरणी शुक्रवारी (२८ जून) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास उदगीर शहर पोलीस ठाण्यात सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.२३ जून २०२२ ते ८ मे २०२४ पर्यंत कैलास नगर छत्रपती संभाजी नगर येथे सासरच्या लोकांनी संगनमत करुन विवाहितेस माहेरहून वडीलांकडून धंदा टाकण्यासाठी १ लाख ५० हजार रुपये घेवून ये असे म्हणून व घरातील लहान सहान कारणावरून तुला स्वयपांक निट करता येत नाही. व घरतील काम निट करता येत नाही. तुझी उंची कमी आहे तु नेहमी आमचे सोबत भांडण का करतीस असे म्हणून   शिवीगाळ करून धमकी देवून उपासी पोटी ठेवून शारीरीक व मानसिक छळ करून शिवीगाळ करून लाथाबूक्याने मारहान करून जिवे मारण्याची धमकी देवून तुला नांदवत नाही असे म्हणून धमकी देवून घरातून हाकलून दिले.
याप्रकरणी संजीवनी सुरज तिवारी (वय २१ वर्ष, रा. कैलास नगर, छत्रपती संभाजी नगर  हा.मू.फुलारी गल्ली, रोकडे हनुमान रोड उदगीर) यांच्या फिर्यादीवरुन उदगीर शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.१८७/२०२४ कलम ४९८(अ), ३२३, ५०४, ५०६, ३४ भादविनुसार सुरज जगन्नाथ तिवारी, सासरे - जगन्नाथ मन्नाप्रसाद तिवारी , सासू -जया जगन्नाथ तिवारी, जाऊ - दिपाली सागर तिवारी (सर्व रा. कैलास नगर, छत्रपती संभाजी नगर) व ननंद - सरीता मनोज बाजपेयी (रा. खोरी गल्ली लातूर) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सरफराज गोलंदाज हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात