Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

*सर्व समाज घटकांना सोबत घेवून सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले : क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे*

*सर्व समाज घटकांना सोबत घेवून सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले : क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे*

*उदगीर येथे जगदंबा बोधन देवी सभागृह, महर्षी वाल्मिकी भवनचे भूमिपूजन*

*उदगीर* : समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेवून विकास करण्याला आपण आजपर्यंत प्राधान्य दिले आहे. त्यानुसार उदगीर, जळकोट तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागात मूलभूत सुविधांची निर्मिती आणि विविध विकासकामे करण्यात आल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी उदगीर येथे बोलताना सांगितले.

उदगीर शहरातील बोधन नगर येथील जगदंबा बोधन देवी सभागृह आणि महर्षी वाल्मिकी भवनचे भूमिपूजन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

 यावेळी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष राहूल केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, लातूरचे माजी नगराध्यक्ष व्यंकट बेद्रे, प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर, नगरपरिषद मुख्याधिकारी सुंदर बोंदर,  मंदिराचे विश्वस्त नामदेव आपटे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, कार्याध्यक्ष वसंत पाटील, माजी नगरसेवक अनिल मुदाळे, शेख फय्याज, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, रासपचे नागनाथ बोडके, माजी नगरसेवक मनोज कपाळे, नजीर हाशमी, राजकुमार भालेराव, व्यंकट बोईनवाड, कल्याण कपाळे, पाशा मिर्झा, आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना ना.संजय बनसोडे यांनी,
समाजातील प्रत्येक घटकांच्या समस्या सोडवून त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. यामध्ये
आरोग्य, दळणवळण, पाणी पुरवठा आदी विविध मूलभूत सुविधांची कामे करण्यावर आतापर्यंत भर देण्यात आला असुन जगदंबा बोधन देवी सभागृहासाठी सुमारे ५५ लक्ष रुपये आणि महर्षी वाल्मिकी भवनासाठी ५३ लक्ष असा एकुण १ कोटी ८ लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हे काम रेखीव आणि गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिका-यांना ना.बनसोडे यांनी दिल्या आहेत. आवश्यकता भासल्यास आणखी निधी देण्यात येणार असल्याचे ना. बनसोडे सांगितले.

उदगीरसाठी स्वतंत्र उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय मंजूर झाले असून लवकरच हे कार्यालय कार्यान्वित होणार आहे. तसेच शहरातील भूमिगत गटार योजनेसाठी जवळपास ३८० कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला असून या कामाची निविदाही लवकरच निघेल. यासोबतच उदगीर, जळकोट तालुक्यातील विविध विकास कामांचे लोकार्पण येत्या काही दिवसांत होणार असल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले.

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, व्यंकट बेद्रे यांनी मनोगत व्यक्त केले. जगदंबा बोधन देवी मंदिराचे विश्वस्त नामदेव आपटे यांनी प्रास्ताविक केले.
या कार्यक्रमास उदगीर शहर व परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात