Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

डिग्रस पाटी जवळ ११ लाखांच्या गुटख्यासह १८ लाखांचा मुद्देमाल ग्रामीण पोलिसांकडून जप्त

डिग्रस पाटी जवळ ११ लाखांच्या गुटख्यासह १८ लाखांचा मुद्देमाल ग्रामीण पोलिसांकडून जप्त

दोन कारसह तिघा आरोपींना केली अटक

उदगीर:तालुक्यातील डिग्रस पाटी उदगीर लातूर रोडवर २३ जून रोज रविवारी सहा वाजेच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत ११ लाखांच्या गुटख्यासह एकूण १८ लाखांचा मुद्देमाल जप्त करून तिघा आरोपींवर २४ जून रोज सोमवारी पाच वाजता गुन्हा दाखल केला आहे,पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की डिग्रस पाटी जवळ  एम.एच.०३ बीसी १५९८ या क्रमांकाची कार व एम.एच १४ सीएस ८९३४ या दोन पांढऱ्या रंगाच्या कार मध्ये ११ लाखांच्या गुटख्याची वाहतूक करीत असताना ग्रामीण पोलिसांनी ११ लाखांचा गुटखा व ७ लाखांच्या दोन कारसह एकूण १८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे उदगीर लातूर रोडवर दोन पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधीत असलेला सुगंधी पान मसाला व तंबाखुजन्य गुटखा आरोपीने संगनमत करून बेकायदेशीर वाहतूक करून अन्न सुरक्षा आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई या लोकसेवकाने जनहितार्थ काढलेला आदेश अधिसूचना क्रमांक आसुमाअ/४९६/७ दिनांक १८ जुलै २०२३ याची माहिती असूनही कायद्याचे उल्लंघन केले,याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल राम विश्वभंर बनसोडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी  रहेमत अली कटुभिया सय्यद राहणार मलिकापूर ता परळी जि बीड,आबेद सालार शेख बरकत नगर परळी जि बीड, फेरोज लतीफ अब्दुल मिलिंद नगर परळी जि बीड यांच्यावर गुरंन ३५३/२४ कलम ३२८.२७२.२७३.१८८.३४ भादवी प्रमाणे २४ जून रोज सोमवारी पाच वाजता उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या आदेशाने अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तारू हे करीत आहेत

Post a Comment

0 Comments

जाहिरात