उदगीर बिदर रोडवर अज्ञात वाहनांच्या धडकेत अनोळखी व्यक्ती ठार
उदगीर:बिदर रोड बिरादार यांच्या दाळमिल समोर अज्ञात वाहनांच्या धडकेत अनोळखी व्यक्ती ठार झाल्याची घटना २४ जूनच्या रोजी पहाटे घडली आहे, सूत्रांनी दिलेली माहिती अशी की बिदर रोडवर बिरादार यांच्या दाळमिल समोर रोडवर एक व्यक्ती मृत अवस्थेत पडल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले,या घटनेची माहिती उदगीर ग्रामीण पोलिसांना देण्यात आली, घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बंटी कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेहाचा पंचनामा केला,व सदरील मृतदेह उदगीर येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे, अज्ञात वाहन चालकाने धडक दिल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे,मृत व्यक्तीच्या हातावर इंग्रजीत ANKOSHI व S.J.M.A असे गोंदलेले आहे,मृत अनोळखी व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी ग्रामीण पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
0 Comments