मोटारसायकल चोरीतील आरोपींला शहर पोलिसांनी ठोकल्या बेड्या १ लाख ६० हजारांच्या ८ मोटारसायकली जप्त
उदगीर:परिसरात व ग्रामीण भागात नेहमी मोटारसायकल चोरीच्या घटना घडत असून मोटारसायकल चोरीतील आरोपींला उदगीर शहर पोलिसांनी बेड्या ठोकून आरोपिकडून १ लाख ६० हजारांच्या एकूण ८ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की १० मे रोजी रघुकुल मंगल कार्यालयाच्या बाजूस पार्क केलेली एम.एच.२४ एडी ५०४९ या क्रमांकाची मोटारसायकल चोरीला गेली होती.याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुरंन १४२/२४ कलम ३७९ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील गुन्ह्याचा तपास आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजवरून त्याच प्रमाणे मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून पोलिसांनी आरोपीचा शोध लावला,त्यानंतर उदगीर शहर पोलिस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने आरोपीची ओळख पटवून २९ जून रोजी आरोपी विनोद विलास भागावे वय ३४ वर्ष राहणार घोणशी ता.जळकोट जि. लातूर या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. विनोद विलास भागावे यांच्या अटके दरम्यान केलेल्या तपासात उदगीर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन गुन्ह्यातील २ मोटारसायकल त्याच बरोबर अन्य वेगवेगळ्या कंपनीच्या ६ मोटारसायकली अशा एकूण १ लाख ६० हजारांच्या ८ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या २ मोटारसायकली उदगीर शहर व उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. उर्वरित मोटारसायकलीचा शोध घेण्याकरिता नांदेड परिक्षेत्र व लातूर जिल्ह्यात बिनतारी संदेश प्रसारित करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक सोमय मुंढे.अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे.उपविभागीय पोलिस अधिकारी शोहेल शेख.यांच्या मार्गदर्शनाखाली व उदगीर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक करण सोनकवडे यांच्या नियंत्रणाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस नाईक गजानन पुल्लेवाड.पोलीस अंमलदार सतिष पवार.पोलीस अंमलदार संदीप साठे.पोलीस अंमलदार दीपक कच्छवे.पोलीस हेडकॉन्स्टेबल ईश्वर बिरादार. पोलीस हेडकॉन्स्टेबल बबन टारपे यांनी आरोपींचा शोध लावून आरोपींला बेड्या ठोकल्या आहेत.
0 Comments