*अनैतिक संबंधातून खून? उच्च न्यायालया द्वारे जामीन*
मा. उच्च न्यायालयाचे मा.न्या.एस. जी. मेहरे यांनी आरोपी जाकेर शेख यास खून खटल्यात जामीन दिला आहे.
प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की,फिर्यादी इम्रान तांबोळी रा. संजय नगर,औसा याने माझ्या मामाच्या मुलगा इस्माईल मणियार याचा कोणीतरी अज्ञात इसमाने खून केल्याची फिर्याद दिली. तपास अंती पोलिसांनी अनैतिक संबंध च्या संशयावर आरोपींना अटक केली.
सदर प्रकरणी आरोपी तर्फे मा. सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असता मा. न्यायालयाने फेटाळून लावला.सदर नाराजीने आरोपी जाकेर याने उच्च न्यायालयात ऍड. रेड्डी यांच्या मार्फत जामीन करिता अर्ज दाखल केला. सदर आरोपी विरुद्ध ढोबळ आरोप केले असून, घटने चा कोणत्याही प्रत्यक्ष दर्शी साक्षीदार आरोपीचे नाव घेत नाही. या आशयाचे युक्तिवाद मा. उच्च न्यायालयाने मान्य करत, आरोपीला जामीन मंजूर केला.
सदर प्रकरणी आरोपी तर्फे ऍड. अजिंक्य रेड्डी यांनी काम पाहिले त्यांना ऍड. विष्णु कंदे यांनी सहकार्य केले.
0 Comments