सोलापूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक उदगिरात अपघातात गंभीर जखमी...
उदगीर शहरातील बिदर रोड उड्डाणपूल जवळ लिंगायत भवन समोर दुचाकी व पिक अप टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील सोलापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी (२९ जुलै) रात्री साडे आठच्या सुमारास झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, दुचाकी क्र. एम.एच.२४ बी जे १५४० या पीक अप टेम्पो क्र. एम.एच.२४ ए.यु.५१८३ या वाहनांचा अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील सोलापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक नारायणराव तुरेवाले (वय ५५ वर्षे रा. संतोषी माता नगर उदगीर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून.त्यांना नागरिकांनी शिवमंगल अपघात रुग्णालय ठाकरे चौक उदगीर येथे उपचारासाठी दाखल केले आहे. घटनास्थळी दोन्ही वाहने थांबलेली असून अपघाताची माहिती उदगीर पोलीसांना देण्यात आली आहे. अपघातग्रस्त पोलीस निरीक्षक अशोक तुरेवाले हे दोन दिवसाच्या सुट्टीवर आपल्या गावी उदगीर येथे आले असता हा अपघात झाला.
0 Comments