वीस रुपये का दिले नाहीस म्हणून ब्लेडने वार,शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
उदगीर शहरातील संदेश मोबाईल शॉपी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकास २० रुपये का दिले नाहीस म्हणून या शुल्लक कारणावरून गळ्यावर ब्लेडने वार करून जखमी केल्याची घटना २२ जुलै रोजी घडली होती.याप्रकरणी ३० जुलै रोज मंगळवारी रात्री ११ वाजता उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,संदेश मोबाईल शॉपी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे २२ जुलै रोजी फिर्यादीने आरोपीस २० रुपये दिले नाही म्हणून याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या गळ्यावर ब्लेडने वार करून गंभीर जखमी केले,सोमनाथ बाबुराव बेलुरे यांच्या फिर्यादी वरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात आरोपी अरविंद तोटरे यांच्यावर गुरंन १९९/२४ कलम १०९ (१) भारतीय न्याय संहिता नुसार ३० जुलै रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक काळे हे करीत आहेत.
0 Comments