शिरोळ जवळ दुचाकी घसरुन पडल्याने एकाचा मृत्यू..
उदगीर तालुक्यातील शिरोळ जवळ येथे एकाचा दुचाकी घसरुन पडल्याने एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी शुक्रवारी (१२ जुलै) सायंकाळी पाचच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगाधर नाथराव बोइनवाड (वय २९ रा.अवलकोंडा ता. उदगीर) असे मृताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.९ जुलै रोजी रात्री सातच्या सुमारास शिरोळ गावाचे पुढे पुलाजवळ रोडवर त्याची होंडा कंपीनीची युनीकान मो. सा.क्रं. एम.एच.२४ बी.यु. ८४५५ ही स्वता चालवीत असलेली मोटारसायकल स्लीप होवुन पडुन छातीला व डोक्याला मार लागुन गंभीर जखमी होवुन, स्वाताचे मरणास स्वता कारणीभुत झाला.
याप्रकरणी रामकिशन नाथराव बोइनवाड (रा. अवलकोंडा ता. उदगीर) यांच्या फिर्यादीवरुन उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाहत्तरे हे करीत आहेत.
0 Comments