संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या जळकोटच्या व्हाईस चेअरमनपदी सत्यवान पाटील यांची निवड
लातूरचे पालकमंत्री गिरीष महाजन, माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, माजी जिल्हापरिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, क्रीडा, युवक कल्याण व बंदरे मंत्री ना.संजय बनसोडे यांच्या सूचने नुसार जळकोट तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर घुगे यांनी गठीत केली. या समितीच्या व्हाईस चेअरमनपदी भारतीय जनता पार्टीचे लातूर जिल्हासरचिटणीस तथा रावणकोळा विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन सत्यवान व्यंकटराव पांडे-पाटील यांची निवड करण्यात आली. यांच्या या निवडी बद्दल भारतीय जनता पार्टी, रावणकोळा सरपंच, उपसरपंच, सदस्य, सदस्या, सोसायटीचे व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, अतनूर, रावणकोळा ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले.
0 Comments