उदगीर शहरात भिंत कोसळून मजूर जागीच ठार
उदगीर:शहरातील देगलूर रोड एल आय सी कार्यालयाच्या जवळ एका इमारतीचे बांधकाम सुरू असताना मजुरांवर भिंत कोसळल्याने मजूर जागीच ठार झाल्याची घटना २२ जुलै रोज सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे सूत्रांनी दिलेली माहिती अशी देगलूर रोडवर असलेल्या एका इमारतीचे बांधकाम सुरू असून इमारतीत काम करत असताना मजुरांच्या अंगावर अचानकपणे भिंत कोसळली यात मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
0 Comments