अतनूर तेरू नदीवरील पर्याय रस्ता पूल गेला वाहुन..! घ्यावे साहेब पाहुन... २८ गावांचा संपर्क तुटला.
गेल्या ४० वर्षांपूर्वी बांधकाम करण्यात आलेल्या जीर्ण पुलाचे ढासळणे व संरक्षण भिंत कट्टडे कोसळून निघून जात असल्या कारणाने या पुलाला या मतदारसंघाचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी नवीन पूल बांधकाम करण्यासाठी कोट्यावधीचा निधी देऊन, नवीन मंजूर केला होता.
पण गेल्या एक वर्षांपुर्वी मंजूर केलेला अतनूर तेरू नदीवरील पुल असूनही त्याचे काम भर पावसाळ्यात व पावसाळ्यातील जुलै महिन्यात सुरू करण्यात आले. जीर्ण पूल पूर्णपणे जेसीबी मशीन सह विविध लोखंडी यंत्रसामुग्रीने जमिनदोस्त करण्यात आले. हा पूल जमिनदोस्त झाल्यानंतर पर्यायी रस्ता म्हणून वाहतुकी करिता नवीन पर्याय रस्ता तयार करण्यात आलेला होता. तो आज दि.२० जुलै रोज शनिवार रोजी गेल्या दोन दिवसापासून पडणाऱ्या रिमझिम पावसामुळे व तेरू नदीला आलेल्या छोट्याशा पुरामुळे संपूर्ण पुल वाहून गेलेला असल्यामुळे परिसरातील अतनूर गावासह गव्हाण, मेवापूर, चिंचोली, गुत्ती, घोणसी, नळगीर, उदगीर, जळकोट तालुका कार्यालय कामे, शासकीय रुग्णालय, बाराहाळी, मुखेड, तसेच लातूर-नांदेड जिल्हा सरहद्दीवरील गावाचा संपर्क पुर्ण पणे तुटला असून दोन, चार चाकी वाहन व एसटी बस वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या पुलावरूनच अतनूर गाव पर जिल्हा, स्व जिल्हा सरहद्द मार्गावर व आंध्रप्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, महाराष्ट्र राज्याच्या सीमावर्ती भागामध्ये वसलेला आहे. अतनूर तेरु नदीचे पात्र दीडशे वर्षांपूर्वी पासूनचे असून यामध्ये बारमाही पाण्याची झुळझुळ वाहत असते. असे असतानाही हा पूल गेल्या एक वर्षांपूर्वी कोट्यावधी रुपये देऊन मंजूर करण्यात आलेला. असतानाही भर पावसाळ्यात तेही जुलै महिन्यामध्येच याचे नवीन बांधकाम करण्याचे ठेकेदाऱ्यांनी रिक्स का घेतली. हे कळण्यासारखा मार्ग व शब्द नाहीत. तसेच आज पूर्णपणे दळणवळण वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली. असून आज रोजी गावात एखादी गॅस्ट्रो सारखी, डेंगू सारखी, हिवतापांसारखी साथ पसरल्यास त्या रुग्णाला तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी या मोठ्या शासकीय, निमशासकीय खाजगी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार हे मात्र निश्चित आहे. हा पुल पावसाळ्यातच बांधण्याचा ठेकेदाराचा हेतू व त्यांच्याकडे काम करण्याची कला कौशल्य, अकार्यक्षमता यावरूनच दिसून येत आहे. त्वरित पर्यायी रस्ता उपलब्ध करावा अन्यथा सोमवारपासून चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा अतनूर सह परिसरातील गावातील ग्रामस्थांनी व प्रतिष्ठित नागरिकांनी दिला आहे.
0 Comments