Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ३ दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर,मराठवाड्यात नांदेड व लातूरला कार्यक्रम

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ३ दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर,मराठवाड्यात नांदेड व लातूरला कार्यक्रम

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेत त्यानंतर पुणे व मराठवाड्यातील नांदेड व लातूर जिल्ह्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. २८ ते ३० जुलै दरम्यान महाराष्ट्रातील विविध ठिकाणी राष्ट्रपती भेट देणार असून या कार्यक्रमांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजीत पवारांचीही उपस्थिती राहणार आहे.

कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं घेणार दर्शन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून २८ ते ३० जुलैदरम्यान राज्यातील विविध ठिकाणांना त्या भेटी देणार असल्याचं समजतंय. २८ जुलैला कोल्हापूरातील महालक्ष्मीच्या मंदिरात त्या दर्शनासाठी जाणार असून त्यानंतर लिज्जत पापड चा गोल्डन जुबिली वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला वारणानगर येथे उपस्थित राहणार आहेत. विशाळगड प्रकरणानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची कोल्हापूरातील उपस्थिती महत्वपूर्ण मानण्यात येत आहे.

पुण्यातील कार्यक्रमांना राष्ट्रपतींची उपस्थिती

दुसऱ्या दिवशी २९ जुलै रोजी पुण्यात सिम्बॉयसिस कॉलेजच्या पदवीदान समारंभात मुख्य अतिथी म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार असून त्याच दिवशी मुंबईत विधान परिषदेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

मराठवाड्यातील या दोन जिल्ह्यांमध्येही राष्ट्रपतींची उपस्थिती

कोल्हापूर, पुणे-मुंबईसह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड जिल्ह्यांतही येणार आहेत. ३० जुलै रोजी राष्ट्रपती नांदेड येथे गुरुद्वाराचे दर्शन करून त्यानंतर लातूर जिल्हयातील उदगीरला बुद्ध विहाराच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि क्रीडामंत्री संजय बनसोडे देखील उपस्थित राहणार आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात