Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

*भाजपाचा कार्यकर्ता असणे ही गौरवाची बाब राहुल केंद्रे*सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात

*भाजपाचा कार्यकर्ता असणे ही गौरवाची बाब राहुल केंद्रे*
सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात 

उदगीर:जगातील सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असणे ही गौरवाची बाब आहे, सदस्य नोंदणी अभियानात आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करून अधिकाधिक सदस्य नोंदणी करूया असे आवाहन लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भाजपाच्या व्हीजेएनटी सेलचे प्रदेशाध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केले. भाजपाच्या सदस्य नोंदणी अभियानांतर्गत उदगीर मतदार संघातील कार्यकर्त्यांची कार्यशाळेत  ते बोलत होते. या अभियानाच्या नोंदणीसाठी उदगीर येथे आयोजित कार्यशाळेस  मोठा प्रतिसाद मिळाला. अध्यक्षस्थानी भाजपाचे शहराध्यक्ष मनोज पुदाले होते तर मुख्य मार्गदर्शक म्हणून राहुल केंद्रे यांची उपस्थिती होती.
कार्यकर्ता हेच भाजपाचे बलस्थान असून याच बळावर भाजपा सर्वश्रेष्ठ पक्ष बनला आहे. सत्ता नसतानाही आणि असतानाही भाजपाने कायम लोकाभिमुख कार्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशभरात आलेले सुशासन व विकासाचा वेग हा जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता प्रयत्नशील आहे असे मत राहुल केंद्रे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.यावेळी शहराध्यक्ष मनोज दादा पुदाले नगराध्यक्ष बस्वराज आण्णा बागबंदे युवा नेते विजय निटुरे तालुकाध्यक्ष शिवशंकर धुप्पे महिला मोर्चा उत्तराताई कलबुर्गे मनोहर भंडे बस्वराज रोडगे साइनाथअप्पा चिमेगावे नगरसेवक दत्ताजी पाटील सुरेंद्र अकंगिरे सरोजाताई वारकरे उषाताई माने यांच्यासह पदाधिकारी शक्ती केंद्र प्रमुख उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात