Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या माळेगाव यात्रेचे वैभव कायम टिकून राहण्यासाठी प्रयत्न करणार;खासदार रवींद्र चव्हाण

दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या माळेगाव यात्रेचे  वैभव कायम टिकून राहण्यासाठी प्रयत्न करणार;खासदार रवींद्र चव्हाण

नांदेड:जिल्ह्यातील सर्वात मोठी माळेगाव यात्रेची आढावा बैठक नांदेडचे जिल्ह्याचे खासदार रविंद्र चव्हाण व लातूर जिल्ह्याचे खासदार डॉ.शिवाजीराव काळगे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी अभिजित राऊत व मुख्यकार्यकारी अधिकारी मिनल करणवाल व अतिरिक्त पोलीस अधिकारी सुरज गुरव यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
या आढावा बैठकीमध्ये विभागाचे सर्व अधिकारी प्रशासनातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. खा.रवींद्र चव्हाण यांनी कृषी प्रदर्शनामध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य तो सन्मान देऊन त्यांचा सत्कार करावा.बारामतीच्या धर्तीवर कृषी प्रदर्शनासाठी चालना द्यावी, जिल्ह्यातील विविध लोककलेला प्रोत्साहन पर बक्षीस वितरित करावे, आशा महत्वाच्या सूचना मांडल्या आरोग्याच्या सुविधेत कुठलीच गैरसोय होणार नाही याची काळजी आरोग्य विभागाने घ्याव्यात अशा सूचना आरोग्य विभागास दिल्या,त्याच बरोबर पोलीस प्रशासनाने यात्रेत बारकाईने लक्ष द्यावे अशा सूचना त्यांनी दिल्या, यावेळी नवीन डिजिटल यंत्रणेचा वापर करून जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करावा स्व.विलासराव विलासरावजी देशमुख यांचे योगदान महत्वाचे आहे .त्यांच्या स्मारकाबद्दल लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा अशी सूचना जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना दिल्या.यात्रेला  राजकीय रूप  न देता यात्रा भाविक भक्तांची आहे आणि ती सुरळीत पार पाडावी असे बोलताना सांगितले
यावेळी मान्यवरांचा जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने व मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या आढावा बैठकीला माजी आमदार रोहिदास चव्हाण,माजी सनदी अधिकारी एकनाथराव मोरे,जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय आप्पा बेळगे, चंद्रसेन पाटील (माजी जिल्हा परिषद सदस्य) संजय भोशीकर (माजी सदस्य जिल्हा परिषद),डॉ.धोंडगे साहेब (माजी सदस्य जिल्हा परिषद) बालाजीराव पांडागळे (तालुका अध्यक्ष कंधार) श्रीनिवास मोरे (मा.सदस्य जि. प.नांदेड)संजय पाटील कराळे (माजी सभापती),संदीप पाटील उमरेकर, आनंदरावजी गुंडिले (मा.अध्यक्ष जि.प. नांदेड) रंगनाथराव भुजबळ गुरुजी(मा.सदस्य जि.प.नांदेड)शरद पवार (तालुकाध्यक्ष लोहा) वसंतराव पवार, नितीन फासगे ,माळेगाव सरपंच ग्रामपंचायत सर्व सदस्य व ग्रामस्थ जिल्हा परिषद च्या सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात