Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

मतदार यादीचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 20 ऑगस्टपर्यंत मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याची संधी

मतदार यादीचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 20 ऑगस्टपर्यंत मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याची संधी

उपविभागीय अधिकारी शुशांत शिंदे

उदगीर, दि.07 : भारत निवडणूक आयोगाने राज्यात यावर्षीचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. पात्र नवमतदारांची मतदार नोंदणी करून घेणे आणि मतदार यादी अद्यायवत तयार करणे, या कार्यक्रमाचा उद्देश आहे. 1 जुलै, 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण दुसरा कार्यक्रमानुसार 6 ऑगस्ट रोजी एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली असून 20 ऑगस्ट 2024 पर्यंत दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. या कालावधीत नवमतदारांना मतदार यादीमध्ये नाव नोंदविता येईल, असे उदगीरचे उपविभागीय अधिकारी शुशांत शिंदे यांनी कळविले आहे.
मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती स्विकारण्यासाठी शनिवार, 10 ऑगस्ट, 2024 आणि रविवार 11 ऑगस्ट 2024, तसेच शनिवार, 17 ऑगस्ट 2024 आणि रविवार, 18 ऑगस्ट 2024 या चार दिवशी उदगीर विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रावर विशेष नोंदणी शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरादिवशी संबंधित यादीभागाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) हे त्यांच्या अधिनस्त यादी भागातील मतदान केंद्रावर उपस्थित राहणार आहेत. लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील  सर्व नागरिकांनी या विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा. तसेच जास्तीत जास्त पात्र मतदारांनी या कालावधीत मतदार नोंदणी करावी,असे अवाहन उपविभागीय अधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी शुशांत शिंदे यांनी केले आहे.
उदगीर मतदार संघात 336 मतदान केंद्र होते,1350 मतदार संख्येच्या वर असलेले 23 मतदान केंद्राची विभागणी करून 23 मतदान केंद्राची नवीन निर्मिती करण्यात आली आहे,23 पैकी उदगीर मतदार संघात 19 नवीन मतदान केंद्राची नवीन निर्मिती व जळकोट तालुक्यात 4 मतदान केंद्राची निर्मिती अशे एकूण 23 मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे, उदगीर मतदार संघात 359 मतदान केंद्राची संख्या झालेली असून उदगीर विधानसभा मतदार संघात 164060 पुरुष मतदार 150114 स्त्री मतदार 17 तृतीयपंथी अशे एकूण 314191 मतदारांची संख्या असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी शुशांत शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात