मनसे उदगीर विधानसभा ताकदीने लढणार !
पदाधिकारी बैठकीत पक्ष निरीक्षक बाळा शेंडगे यांची घोषणा.
उदगीर :- आगामी 2024 विधानसभा निवडणुकीत संदर्भात नुकत्याच मुंबई येथे झालेल्या संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकारी मेळाव्यात मुंबई येथे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी होऊ घातलेल्या विधानसभेत 225 ते 250 जागा मनसे लढवणार अशी घोषणा केली त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रभर राज्य पदाधिकारी महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात विधानसभा निहाय दौरे करत असून आतापर्यंत सर्व विधानसभेत पक्ष निरीक्षकांचे दोन दोन दौरे झाले आहेत त्याचाच एक भाग म्हणून मनसे प्रदेश सरचिटणीस श्री बाळा शेडगे साहेब हे उदगीर विधानसभा दौऱ्यावर आले होते यावेळी उदगीर विधानसभेतील पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली उदगीर विधानसभेतील शाखा निहाय संघटनात्मक बांधणी लक्षात घेऊन तसेच बैठकीस कार्यकर्त्यांची लक्षणे उपस्थिती पाहून उदगीर विधानसभेतील पक्ष पदाधिकाऱ्यांनी आजपर्यंत केलेले कार्य,जनतेच्या प्रश्नावर केलेली आंदोलन आणि तसेच कार्यकर्त्यांचा जनसंपर्क पाहता मनसे या ठिकाणी विधानसभा ताकतीने लढू शकते तसेच जिंकू ही शकते असे मत व्यक्त करत तसा अहवाल राज ठाकरे यांना दिला जाईल आणि मनसे विधानसभा ताकतीने लढवेल अशी घोषणा केली
यावेळी जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांनी प्रास्ताविक केले त्याप्रसंगी बोलताना उदगीर विधानसभेतील महाराष्ट्र सैनिक प्राणप्रणाली तेही जिंकण्यासाठी लढतील असे आश्वासन पक्ष निरीक्षकांना दिले तसेच प्रदेश सरचिटणीस संतोष नागरगोजे यांनी आपले मत व्यक्त करताना उदगीर विधानसभा भविष्यात मनसेचा बालेकिल्ला होईल यात कुठलीही शंका नाही पक्ष पुर्ण ताकदीने उदगीर विधानसभा लढवेल यासाठी आम्ही राज साहेबांना आग्रह करू असे आश्वासन दिले
या बैठकीस प्रदेश उपाध्यक्ष नवीन आचार्य सह त्यांचा संघ, जिल्हाध्यक्ष संजय राठोड मनविसे जिल्हाध्यक्ष किरण चव्हाण, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रीतीताई भगत, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब शिवशेट्टे ,उदगीर तालुकाध्यक्ष संग्राम रोडगे,जळकोट तालुका अध्यक्ष महेश देशमुख, शहराध्यक्ष संतोष भोपळे, सुनील तोडकर ,संग्राम केंद्रे, सतीश चव्हाण, जब्बार तांबोळी, गजेंद्र जाधव, बालाजी पवार,रामदास तेलंगे, योगेश चिद्रेवार, दिनेश पवार,योगेश पवार,बापू जाधव, रोहित बोईनवाड,रणजीत भंडे, अजय भंडे, विनोद चव्हाण, लखन पुरी ,अविनाश ठाकूर ,रोहित खरात, भानुदास राजेकर, धोंडीराम हिंगमिरे, बालाजी धोत्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते या बैठक प्रसंगी माजी तालुका उपाध्यक्ष विलास मोहटे ,तानाजी महाटे,तसेच शेल्हाळ तंड्याचे अविनाश जाधव, संतोष जाधव,सतिश जाधव, पप्पु जाधव,हरिबा जाधव इत्यादींनी पक्ष प्रवेश केला.
0 Comments