Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

कातपुर येथे पंकज लॉजवर छापा,तीन महिलांची सुटका,पाच आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

कातपुर येथे पंकज लॉजवर छापा,तीन महिलांची सुटका,पाच आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

लातूर शहरापासून जवळच असलेल्या कातपूर येथील पंकज लॉजवर लातूर पोलिसांच्या AHTU शाखेने छापा टाकून ३ महिलांची सुटका केली व वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या ५ आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लातूर शहर व जिल्ह्यात लॉज व हॉटेलच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविला जात असल्याबाबत गुप्त माहिती मिळाल्याने सदर बाबत कडक कारवाई करणे साठी श्री सोमय मुंडे, पोलीस अधीक्षक लातूर यांचे कडून सक्त आदेश पारित झाले होते.
लातूर शहरापासून जवळच असलेल्या कातपूर गावाजवळील पंकज लॉज या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची गुप्त माहिती अनैतिक मानवी व्यापार व वाहतूक प्रतिबंधक कक्ष (AHTU) ला प्राप्त झाली होती. तेथील हॉटेल मालक व मॅनेजर काही महिलांना हॉटेलवर आणून वेश्या गमनासाठी एजंट करवी गिऱ्हाईक आणून वेश्या व्यवसाय चालवीत आहेत अशी माहिती प्राप्त होती.
मिळालेल्या माहितीची खातरजाम करून त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनाखाली AHTU कडून एक पथक स्थापन करण्यात आले. तसेच २ शासकीय पंचांना बोलून एक बनावट ग्राहक वेश्या गमनाच्या नावाखाली लॉजवर पाठविण्यात आला होता. बनावट ग्राहकाकडून इशारा मिळतात पथकाकडून पंकज लॉजवर छापा टाकण्यात आला. सदर छाप्यात बाहेर गावाहून आणलेल्या ३ महिला मिळून आल्या तर लॉज मालक, मॅनेजर, एजंट यांना लॉजवरून ताब्यात घेण्यात आले आहे.

सदर प्रकरणी वेश्या गमनासाठी आणलेल्या ३ महिलांची सुटका करण्यात आली आहे तर आरोपी नामे

1) विकास बापूसाहेब पडवळ वय 47 वर्ष, रा कातपूर, ता.जि. लातूर.

2) बालाजी नागोराव देवकते, वय 30 वर्ष रा कातपूर, ता. जि. लातूर.

3) अभिषेक सूर्यवंशी रा शिवनी, ता. जि. लातूर. (फरार)

4) बाळासाहेब नागनाथ जाधव, रा. कातपुर, ता.जि. लातूर.

5) अजय रत्नाकर कांबळे,वय 25 वर्ष, रा सताळा, ता. उदगीर जि. लातूर.

यांना अटक करण्यात आली असून आरोपी अभिषेक सूर्यवंशी हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
सदर प्रकरणी लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री माकोडे हे करीत आहेत.
वेश्या व्यवसाया बाबत काही माहिती मिळाल्यास त्याबाबत AHTU कक्ष, पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर येथे कळविण्या बाबत लातूर पोलिसांकडून आव्हान करण्यात आले आहे.
सदरची कारवाई श्री सोमय मुंडे, पोलिस अधीक्षक, लातूर व श्री अजय देवरे, अपर पोलिस अधीक्षक, लातूर यांचे मार्गदर्शनात, श्री राजकुमार पुजारी, पोलिस निरीक्षक, नियंत्रण कक्ष यांचे सोबत AHTU चे श्री दयानंद पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक, श्री सुभाष सूर्यवंशी, पोलिस उप निरीक्षक, पोलीस अंमलदार सदानंद योगी, प्रकाश जाधव, सुधामती वंगे, कविता मुळे, राजश्री हेंगणे, निहाल मणियार यांचे पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात