उदगीर बसस्थानकात ऱ्हदयविकाराच्या धक्क्याने लातूर येथील प्रवाशाचा मृत्यू...
उदगीर शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात बसच्या प्रतिक्षेत असलेल्या एका लातूर येथील प्रवाशाचा ऱ्हदयविकाराच्या तिव्र धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (८ऑगस्ट) रात्री आठच्या सुमारास घडली. किरण रामराव कुलकर्णी (वय ५१ वर्षे, रा. गंगा बिल्डिंग, लातूर) असे मृताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी रात्री उदगीर येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात बसच्या प्रतिक्षेत असलेले किरण रामराव कुलकर्णी यांना ऱ्हदयविकाराचा तिव्र धक्का आल्याने ते खाली जमीनीवर कोसळले ही घटना शेजारच्या प्रवाशांना कळताच तात्काळ पोलीसांना माहिती देण्यात आली. उदगीर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अक्षय पाटील, पोलीस नाईक विनायक चव्हाण,सचिन नाडागुडे,संतोष पोते यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या प्रवाशाला सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्या प्रवाशाला तपासून मृत घोषित केले.
0 Comments