उदगीर मतदार संघातील सर्व तांड्याना स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून द्यावी,
उदगीर/प्रतिनिधी
उदगीर मतदार संघातील सर्व तांड्याना स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी खूप अडचणी येत आहेत.उदगीर मतदार संघातील अनेक तांड्यात जे मजुरदार आहेत ज्यांना अजिबात शेती नाही अशा व्यक्तीच्या कुटुंबात दुःखद घटना घडली की त्या कुटुंबातील प्रेतावर ओढ्यात अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.यामुळे बंजारा समाजात मोठी अडचण निर्माण झाली आहे.
उदगीर तालुका गोर सेनेच्या वतीने ९ ऑगस्ट रोज शुक्रवारी उदगीर मतदार संघातील सर्व तांड्याना प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून द्यावी अन्यथा आंदोलन करू अशी मागणी तहसीलदाराकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी गोर सेनेचे तालुका उपाअध्यक्ष जयपाल वैजनाथ राठोड, कोषाध्यक्ष लक्ष्मण बालाजी जाधव,तालुका सचिव सुनील किशन चव्हाण आदी उपस्थित होते.
0 Comments