उदगीर बसस्थानकात बसमध्ये चढताना शेतकऱ्याच्या खिशावर चोरट्यांने हात फिरवत १ लाख ३९ हजार ८५० रुपये पळविले..
उदगीर : प्रतिनिधी
उदगीर अडत बाजारपेठेतून तुर विकून तुरीची पट्टी १ लाख ३९ हजार ८५० घेऊन जाताना उदगीर बसस्थानकात बसमध्ये चढताना पँटच्या उजव्या खिशातून शेतकऱ्याची सदरची रक्कम चोरट्यांने काढून घेतली. याप्रकरणी रविवारी १९ जानेवारी दुपारी दोनच्या सुमारास उदगीर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की. ७ जानेवारी रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास फिर्यादी हा त्याचे शेतातील तुर विकण्यासाठी खाजगी टेंपोने बोथी येथून उदगीर येथील हिराशंकर रावणगावकर यांच्या आडत दुकानात तुर विकली आडत दुकानातून तुरीची रोख रक्कम १ लाख ३९ हजार ८५० रुपये घेऊन शेतकऱ्यांने पँटच्या उजव्या खिशात ठेवुन बोथी गावाकडे जाण्यासाठी उदगीर बस्थानकात आला,उदगीर बस्थानकात बस मध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात चोरटयाने शेतकऱ्यांच्या खिशावर हात फिरवून रोख रक्कम चोरुन नेली आहे.
याप्रकरणी महालींग शंकरअप्पा अक्कानवरु रा.बोथी ता.चाकुर यांच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत.
0 Comments