विवेकानंद नगर ते व्यंकटेश नगर परिसरात नागरी सुविधांच्या अभावामुळे नागरीक त्रस्त, मनसे आंदोलनाच्या पावित्र्यात.
उदगीर:- स्वामी विवेकानंद नगर ते व्यंकटेश नगर, नाईक चौक या ठिकाणी गेल्या 25 वर्षापासून रहिवाशी परिसर असून सुध्दा या भागात अद्यापही परिपूर्ण नागरी सुविधा झालेल्या नाहीत. सदरील परिसरात पक्के रस्ते, नाली, सफाई, यांचा अभाव असल्याने परिसरात सांडपाण्याची, कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात येत असून परिसरातील बहुतांश रस्ते कच्चे असल्याने पावसाळयात नागरीकांना चिखलातून ये-जा करावी लागते. तसेच सांडपाण्यामुळे पावसाळयात रोगराईची समस्या निर्माण होत असल्याने सदरील परिसरातील नगर परिषद प्रशासनाने तात्काळ लक्ष देवून परिसरातील रस्ते, सांडपाण्यासाठी नाली विकास काम निर्माण करावे.
अन्यथा या परिसरातील समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उदगीरला तीव्र आंदोलन करावे लागेल. आशा अशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुख्याधिकारी,नगर परिषद, उदगीर यांना देण्यात आले यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष संजय राठोड, शहर उपाध्यक्ष केदार पुराणिक, आदित्य पाटील, आदित्य कनाडे, वैभव सांगवीकर, ओमकार कनाडे, कुमार कनाडे, किशोर बिरादार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments