Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

धन्वंतरी मध्ये दिवंगत डॉ.गुरुराज वरनाळे यांना श्रद्धांजली अर्पण

धन्वंतरी मध्ये दिवंगत डॉ.गुरुराज वरनाळे यांना श्रद्धांजली अर्पण

उदगीर:धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि चॅरिटेबल हॉस्पिटल,उदगीर येथील प्रा.डॉ.गुरुराज वरनाळे यांचे महाकुंभमेळा,प्रयागगराज येथे जात असताना मध्यप्रदेश राज्यातील सतना जिल्ह्यामध्ये झालेल्या अपघातात दिनांक :-22/02/2025 रोजी अत्यंत दुर्दैवी निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. राखी व मुलगा रेयांश तथा आई-वडील व दोन भाऊ आहेत.
बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ,अहमदपूरचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव माजी मंत्री,महाराष्ट्र राज्य आणि सचिव बाबासाहेब पाटील सहकार मंत्री,महाराष्ट्र राज्य,संचालक साहेबराव जाधव,सहसचिव बळीराम भिंगोले व अविनाश जाधव,कोषाध्यक्ष अंकुशराव कानवटे तथा संचालक मंडळाने स्व.डॉ गुरुराज यांच्या अकाली निधनाबद्दल शोकसंवेदना व्यक्त करून त्यांच्या पत्नी डॉ.राखी व परिवारातील सदस्यांना आणि तसेच सहकाऱ्यांना सांत्वना दिली.
धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज,उदगीर येथे आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात बोलताना प्राचार्य डॉ.दत्तात्रय पाटील म्हणाले कि स्व.डॉ.गुरुराज वरनाळे हे रसशास्त्र व भैजषज्यकल्पना विभागामध्ये मागील साडेचार वर्षापासून कार्यरत असताना अतिशय मनमिळाऊ,कर्तव्यदक्ष,विद्यार्थी प्रिय,हसतमुख व्यक्तिमत्व,तांत्रिक दृष्टया सक्षम,उत्कृष्ट खेळाडू,प्रत्येकाशी स्नेहभाव जपणारे,रुग्णांची आपुलकीने वैद्यकीय सेवा करणारे व अभ्यासू तथा महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी सदैव प्रामाणिकपणे सचोटीने अथक परिश्रम घेणारे व प्रत्येकाला आत्मीयतेने निःस्वार्थ भावनेतून सदैव तातडीने मदत करणारे अश्या विविध गुणांचे व्यक्तिमत्व होते तथा त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबात व महाविद्यालयात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे नमुद केले.
याप्रसंगी डॉ.संजय कुलकर्णी,डॉ. सुनील बनशेळकीकर,डॉ.रामेश्वर जाधव,डॉ.सायाराम श्रीगिरे,डॉ.मंगेश मुंढे,डॉ.राजेंद्र धाटे,डॉ.बालाजी कट्टेवार,डॉ.प्रशांत बिरादार,डॉ.मल्लिकार्जुन बिरादार,डॉ.सचिन टाले,डॉ.विष्णुकांत जाधव,डॉ.प्रवीण बलुतकर यांनी आपल्या शोकभावना भावना व्यक्त करताना स्व.डॉ.गुरुराज वरनाळे यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाचा उल्लेख केला.
याप्रसंगी स्व.डॉ.गुरुराज यांना दोन मिनिट मौन पाळून अंतःकरणपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तथा ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व कुटुंबियांना,आप्तेष्टांना व मित्रपरीवाराला त्यांच्या निधनामुळे झालेल्या या कधीही भरून निघू न शकणाऱ्या दुर्दैवी संकटातून सावरण्याची हिंमत व हे अतीव दुःख सहन करण्याची शक्ती देवो ही प्रार्थना करण्यात आली.
याप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात