Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस अधीक्षक लातूर सोमय मुंडे यांना महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचा राज्यस्तरीय "बाल स्नेही" पुरस्कार जाहीर



पोलीस अधीक्षक लातूर सोमय मुंडे यांना महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचा राज्यस्तरीय "बाल स्नेही" पुरस्कार जाहीर
 
लातूर:पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून  बालकांसंदर्भात केलेल्या कामगिरीचा आधार घेऊन पुरस्कार जाहीर झाला आहे.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये सायबर क्राईम, पोक्सो कायदा, रॅगिंग कायदा, बालविवाह, बालमजुरी, वाहतूक नियमन, ज्येष्ठ नागरिक कायदा, विविध हेल्पलाइन्स  इत्यादी बाबत जनजागृती करण्यासाठी  पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली "इन्स्पेक्टर दामिनी" ही 14 चित्रकथांची पुस्तिका महाराष्ट्रात प्रथमच तयार करण्यात आली आहे. 
डमी गन, चाकू, तलवार व वाहनांसोबत स्टंट असणारे दृश्य सोशल मीडियाद्वारे पोस्ट करणारे तरुणांना सायबर सेलच्या  माध्यमातून शोधून यातील अल्पवयीन मुलांना त्यांच्या पालकांसह बोलावून असे गैर कृत्य न करणे बाबत समुपदेशन करून अशा प्रकारे 157 मुलांना साभार परत  करण्यात आले आहे.लातूर शहर व जिल्ह्यातील विविध शाळांमधील 30 हजार विद्यार्थ्यांची पोलीस सुरक्षा संदर्भात जनजागृती करण्यासाठी निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली आहे.शालेय विद्यार्थ्यांकरिता लातूर जिल्हा पोलीस दलाकडून भव्य पोलीस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत असून यात हजारो शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.
काही कॉफी शॉप चालक विद्यार्थ्यांना डार्क रूम, आडोसा करून चुकीच्या कृत्यांना वाव देत होते ही बाब निदर्शनास येतात मा पोलीस अधीक्षक साहेब यांनी पत्रव्यवहार करून दिनांक 20 जून 2023 पासून मा जिल्हाधिकारी साहेब लातूर यांनी कॉफी शॉप चालकांकरीता अधिसूचना जारी केली आहे.
विद्यार्थी व नागरिकांना पोलीस सुरक्षा संबंधी जनजागृती करण्यासाठी प्रत्येक वर्षी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते.
टाटा सामाजिक आणि विज्ञान संस्था ची प्रयास च्या सहकार्याने राज्यात प्रथमच 2 दिवशीय अपराधी पुनर्वसन कार्यशाळेचे आयोजन करून यात 189 अपराधी सामील झाले होते. 
याशिवाय महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य यांचे उपस्थितीत बालकांसंदर्भात 2 कार्यशाळांचे आयोजन, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष च्या मदतीने ऑपरेशन मुस्कान अंतर्गत अल्पवयीन मुला-मुलींचा शोध, बाल कामगार व बाल मजुरी यास प्रतिबंध करण्यासाठी कायदेशीर कारवाई. आषाढी एकादशीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांची सायबर वाहतूक जनजागृती दिंडीचे आयोजन, दामिनी पथक, भरोसा सेल च्या माध्यमातून 1 लाखांपेक्षा जास्त शालेय विद्यार्थ्यांना भेट देऊन त्यांना पोक्सो कायदा, विविध सुरक्षा संबंधी हेल्पलाइन्स, गुड टच बॅड टच इत्यादी संबंधित जनजागृती करण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी बालकांच्या सुरक्षितेसाठी अखंडपणे, प्रभावीपणे केलेल्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या 2024 च्या  बालस्नेही पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात