उदगिरात चालत्या बसमध्ये महिला कंडक्टरास चापट लगावले; एकाविरुध्द गुन्हा..
उदगीर ते लातूर जाणाऱ्या बसच्या महिला कंडक्टरास उदभ्वलेल्या वादात चापट लगावले. याप्रकरणी शनिवारी (१५ मार्च) रात्री उदगीर शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामास अडथळा केल्या प्रकरणी एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, १५ मार्च रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास फिर्यादी ही त्याचे ताब्यातील उदगीर - लातूर ही शासकीय बस क्र. एम.एच.२४ ए.यु.७९८६ ही बस उदगीर बसस्थानकातून निघून उदगीर पंचायत समिती समोर आली असता यातील आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करुन चापटाने मारहान केली शासकिय कामात अडथळा निर्माण केला.
याप्रकरणी महिला कंडक्टर अनुराधा सुभाषराव कारामुंगे (उदगीर आगार रा. हावगीस्वामी चौक चौबारा रोड, उदगीर) यांच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.८०/२०२५ कलम १३२, ११५(२), ३५२ भारतीय न्याय सहिंता नुसार मंगेश शिवाजी बेलुरे (रा. सगांचीवाडी ता. चाकुर) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकाँस्टेबल हारणे हे करीत आहेत.
0 Comments