Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

जळकोट रोड ते देगलूर रोड पर्यंतचा पाणंद रस्ता खुला करून मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात

जळकोट रोड ते देगलूर रोड पर्यंतचा पाणंद रस्ता खुला करून मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात

नागरिकांचा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा

उदगीर/प्रतिनिधी
उदगीर:जळकोट रोड ते शासकीय आयटी आय कॉलेज महादेव मंदिर देगलूर रोड पर्यंतचा निजामकालीन पाणंद रस्ता खुला करावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी मागील बरेच वर्षांपासून लावून धरली आहे,परंतु प्रशासनाने स्थानिक नागरिकांच्या मागणीकडे आजपर्यंत डोळेझाक करीत आहे, या भागातील नागरिकांना पाणंद रस्ता सोडून दुसरा रस्ताच नसल्याने रस्त्याअभावी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे,रस्ता नसल्याने या भागात मूलभूत सुविधेचाही प्रश्न निर्माण झालाय, नगरपालिका प्रशासनाने या परिसरातील नागरिकांकडून कर वसूल करते परंतु कोणत्याही प्रकारची मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत नाही, या सर्व बाबींकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जळकोट रोड ते देगलूर रोड पर्यंतचा नकाशावरील शासकीय पाणंद रस्ता मोकळा करून नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,या मागणीसाठी परिसरातील रहिवाशांनी १७ मार्च रोज सोमवारी ११ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून उदगीर उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत उपजिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

Post a Comment

0 Comments

जाहिरात