Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

वाढदिवस कृती समितीचा समाजभिमुख उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

*उदगीर* : उदगीर मतदार संघाचे भाग्यविधाते विकासरत्न, विकास पुरुष माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त आ.संजय बनसोडे कृती समिती व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने काल विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला.
वाढदिवस कृती समितीच्या वतीने माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांचा मतदारसंघातील डिग्रस पासून भव्य रॅली काढून शेकडो वाहनांच्या ताफ्यांमध्ये उदगीर शहरात आ.संजय बनसोडे यांचे आगमन करुन त्यांच्यावर पुष्पवृष्टी व मोठ मोठे पुष्पहार घालून जंगी स्वागत करून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. शहरात स्वागत कमानी व शुभेच्छा देणारे मोठे बॅनर विशेष आकर्षण ठरत होते. आमदार संजय बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले त्यामध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, बेघरांना ब्लॅंकेट, होतकरू महिलांना साडी वाटप, रुग्णांना फळे वाटप, अंधविद्यालयात अन्नदान, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर असे समाजाभिमुख कार्यक्रम घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघात समाजसेवेचा नवा पॅटर्न निर्माण केल्याने सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
आ.संजय बनसोडे यांच्या दीर्घायुष्यासाठी उदगीर येथील भुईकोट किल्ला येथे महाआरती,खाजा सदरोद्दीन बादशाह दर्गा येथे चादर चढविणे, शहरातील उर्दू मदरसामध्ये दुवा करण्यात आली.  
याप्रसंगी आ.संजय बनसोडे यांच्या पत्नी सौ.शिल्पा बनसोडे उपस्थित होत्या.
यावेळी आ.संजय बनसोडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उदगीर
 नगर परिषदेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गंत लाभार्थ्यांना घरकुल निधी वाटप, घरकुल लाभ वितरण व लाड समिती अंतर्गत नियुक्त कर्मचाऱ्यांना आदेश वाटप तर उदगीर पंचायत समिती येथे हिरकणी कक्षाचे उद्घाटन महिला बचत गटाचे धनादेश वितरण घरकुल लाभ वितरण, 53000 वृक्ष लागवडीचा शुभारंभ व 5300 वृक्षांचा वितरण सोहळा आ.संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उदगीर शहराध्यक्ष सय्यद जानीमिया व तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, कार्याध्यक्ष वसंत पाटील प्रा. शाम डावळे, शहर कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे,   माजी नगरसेवक अनिल मुदाळे, माजी सभापती  बाळासाहेब मरलापल्ले, अनिरुध्द गुरुडे, नरसिंग शिंदे, फय्याज शेख, नवनाथ गायकवाड, इम्तियाज शेख, इमरोज हाशमी, प्रकाश राठोड, धनाजी मुळे, सुदर्शन पाटील तोंडचिरकर, ज्ञानेश्वर बिरादार येणकीकर, नामदेव मुळे,  माजी उपनगराध्यक्ष फैजुखाँ पठाण,  महिला शहराध्यक्षा मधुमती कणशेट्टे, अॅड.वर्षा कांबळे, वैशाली कांबळे, हुस्ना बानो,सनाउल्ला खान, शफी हाशमी, प्रदीप जोंधळे, अभिजित औटे, मनोज पुदाले, अमोल अनकल्ले, बाळासाहेब पाटोदे, जितेंद्र शिंदे, माधव पाटील, संदीप देशमुख, सुनिल केंद्रे, संगम टाले, प्रभाकर पाटील, राजकुमार गंडारे, शिवकुमार कांबळे, अरविंद गिलचे, महेश बिरादार, राहुल सोनवणे, सतिश पाटील माणकीकर, आखिल मोमीन, अझहर मोमीन, सय्यद शेरु , चंद्रशेखर पाटील, राहुल सोनवणे,  इब्राहिम देवर्जनकर, व्यंकट बोईनवाड, नरसिंग शिंदे, इमरोज हाशमी, राजकुमार चव्हाण, इब्राहिम नाना पटेल, फेरोज पठाण, गिरीष उप्परबावडे, इम्तियाज शेख, भास्कर पाटील,हिफ्जुरहेमान हाशमी, संघशक्ती बलांडे, बापू साळुंखे, बाळु सगर, मुकेश भालेराव, अभिजित औटे, सतिश कांबळे, वाहेद खुरेशी, आदीसह मतदार संघातील सरपंच, चेअरमनसह कार्यकर्ते, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात