*विश्वरत्न , भारतरत्न प.पु डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे 30 ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अनावरण*
*स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2025 आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा पूर्वतयारी व आढावा बैठक*
*योग्य नियोजन करुन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवणुका जिंकु : माजी मंत्री आ.संजय बनसोडे*
*उदगीर* : येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार असून ज्या कार्यकर्त्यांनी दिवसरात्र एक करून पक्षासाठी मेहनत घेतली त्यांना न्याय देण्याची ही निवडणूक असून मागील काळात केलेल्या विकास कामाच्या जोरावर आपण जनतेसमोर जाऊन मत रुपी आशीर्वाद मागणार असून येत्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवणुका जिंकु असा विश्वास माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केला आहे.
ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजीत
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२५ व भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा अनावरण सोहळा पूर्व तयारी आढावा बैठकीप्रसंगी अध्यक्ष पदावरून बोलत होते.विश्वरत्न प.पु. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुर्णाकृती उभारावा अशी गेल्या अनेक दशकापासुनची समाजबांधवांची मागणी होती. त्यांच्या मागणीचा विचार करुन विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य - दिव्य पुतळ्याचे येत्या ३० आॅक्टोबरला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार धर्मशाळेचे लोकार्पण, विश्वशांती बुध्द विहाराच्या परिसरात सुशोभिकरण त्यानंतर उद्यानाचे भुमीपुजन आणि गव्हाण ते चाकुर या हॅम २ च्या सिमेंट रोडचा भुमीपुजन सोहळा संपन्न होणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास मतदार संघातील सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही आ.संजय बनसोडे यांनी यावेळी केले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अफसर शेख, प्रदेश सरचिटणीस अॅड.व्यंकट बेद्रे, प्रा.अंकुश नाडे, भरत चामले, बाबासाहेब काळे पाटील, रामराव राठोड, चंदन पाटील नागरगोजे, समीर शेख, प्रा.श्याम डावळे, तालुकाध्यक्ष बालाजी भोसले पाटील, ता.कार्याध्यक्ष वसंत पाटील, शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, जळकोटचे सभापती विठ्ठल चव्हाण, जळकोट राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संग्राम हासुळे पाटील, प्रदेश सचिव इम्तियाज शेख, अभिजित औटे, शफी शेख, प्रदीप जोंधळे, ज्ञानेश्वर बिरादार, अनिल मुदाळे,खाजा तांबोळी, सुनिल केंद्रे, महेश बिरादार, रवीप्रभा खादीवाले, दिपाली औटे, मधुमती कणशेट्टे , वैशाली कांबळे, अॅड. वर्षा कांबळे, हुस्नाबानो शेख, काजल मिरजगावे, सिमा नेत्रगावकर, वर्षा बनसोडे, मंदा पुणेकर, माया कांबळे, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, येत्या काळात नगर परिषद, महानगर पालिका, जिल्हा परिषद , पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत पक्षातील वरिष्ठांच्या आदेशाने ज्या ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी काम केले. त्यांना न्याय देण्यासाठी मी सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून पुढचे तीन महिने आपण सर्वजण खुप कष्ट करुन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकू व पक्षश्रेष्ठीने जो आदेश आपल्या सर्वांना देतील तो अंतिम समजून काम करु असे सांगितले.
यावेळी येत्या निवडणुकीत ईच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी पक्षश्रेष्ठी समोर आपणास उमेदवारी मिळावी म्हणून इच्छा व्यक्त केली.
यावेळी ग्रामीण व शहरातील पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments