Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

शिवाजी राजे महाविद्यालय उदगीर येथे ग्रंथ प्रदर्शन व मराठी विभागाला भरीव ग्रंथाची भेट

शिवाजी राजे महाविद्यालय उदगीर येथे ग्रंथ प्रदर्शन व मराठी विभागाला भरीव ग्रंथाची भेट

उदगीर:आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालय उदगीर येथे ग्रंथ प्रदर्शन व मराठी विभागाला भरीव ग्रंथाची भेट देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. ७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा आमदार, प्रदेश सरचिटणीस तथा सर्व फ्रन्टल व सेल   प्रभारी रोहितदादा पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी भव्य ग्रंथ प्रदर्शन व महाविद्यालयास ग्रंथ भेट देण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, उद्घाटक म्हणून प्रदेश सरचिटणीस प्रा. शिवाजीराव मुळे तर प्रमुख उपस्थिती म्हणून अजित शिंदे राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्र सेवादल, ज्ञानेश्वर पाटील तालुका अध्यक्ष, व्यंकटराव पाटील तालुका अध्यक्ष, गजानन सताळकर शहर कार्याध्यक्ष, श्रीकांत पाटील युवा नेते, आशिष राजूरकर संचालक, कृ. उ. बा. समिती, प्रा. सुनील शिंदे,  ग्रंथ विभाग प्रमुख विष्णु पवार, हरित बुक गॅलरीचे सचिन कांबळे, चंद्रशेखर कट्टे युवक प्रदेश सचिव, मनमंथ कोनमारे ज्येष्ठ नेते, श्रीनिवास एकुर्गेकर युवक प्रदेश सचिव, काँग्रेस, विवेक जाधव युवक तालुकाध्यक्ष, काँग्रेस पार्टी उदगीर, सोनू पिंपर युवक शहराध्यक्ष, काँग्रेस पार्टी होते. 
या कार्यक्रमात मराठी विभाग, छ. शिवाजी राजे महाविद्यालय, उदगीर व हरिती बुक गॅलरी, लातूर यांनी सहभाग नोंदवला. 
तर आयोजक म्हणून अ‍ॅड. निशांत वाघमारे प्रदेश उपाध्यक्ष, युवक, अजय शेटकार (युवक शहराध्यक्ष, उदगीर, कृष्णा घोगरे युवक तालुकाध्यक्ष, उदगीर, सुशांत बनसोडे जिल्हाध्यक्ष, सोशल मीडिया व प्रेम तोगरे यांनी परिश्रम घेतले. सदरील कार्यक्रमा चे सूत्रसंचालन धनाप्पा बनसोडे यांनी केले.

Post a Comment

0 Comments

जाहिरात