Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

नागरी समस्येचे माहेरघर भगीरथ राजा नगर ! सिमेंट रस्ते, नाली नसल्याने पसरली दुर्गंधी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात !

नागरी समस्येचे माहेरघर भगीरथ राजा नगर ! सिमेंट रस्ते, नाली नसल्याने पसरली दुर्गंधी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात !
उदगीर / प्रतिनिधी
शहरातील प्रभाग क्रमांक चार मधील भगीरथ राजा नगर जळकोट रोड उदगीर लगत असलेल्या भगीरथ राजा नगर ते कमलेश्वर कन्या विद्यालय उदगीर या चिखलमय रस्त्यांचे सिमेंट रोड रस्ता व नाली बांधकामसह रस्त्याची पथदिवे इत्यादी सुख सुविधा करण्याबाबत मुख्याधिकारी नगरपरिषद उदगीर यांना रहिवाशांनी निवेदन देऊन मागणी केली आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक चार मधील भगीरथ राजा नगर ते कमलेश्वर कन्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालय या भागातील रस्ते नसल्यामुळे कच्च्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने या भागातील नागरिकांना कुठलीही सुविधा मिळत नाही की, नगरपरिषद लक्ष देत नाही. त्यामुळे हा भाग म्हणजे नागरिक समस्येचे माहेरघरच बनला असल्याचे चित्र दिसून येत आहे
शहरातील प्रभाग चार मधील भगीरथ राजा नगर कमलेश्वर कन्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालय ते गोविंदशेशीनिवास ते छत्रपती शिवाजीनगर या भागात गेल्या अनेक वर्षांपासून सिमेंट रोड, नाली बांधकाम व पथदिवे इत्यादी सुख सुविधा व्हाव्यात यासंदर्भात येथील रहिवाशांच्या वतीने अनेकवेळा मुख्याधिकारी नगरपरिषद व जिल्हाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी नगराध्यक्षांसह उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे व तोंडी सतत मागणी केली असतानाही अक्षम्य दुर्लक्ष केले गेले. आज उन्हाळ्यातही या रस्त्याने धड चालताही येत नाही.
दि.८ मे रोजी येथील रहिवाशांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांना दिलेल्या निवेदनात या भागातील रस्ते चिखलमय व छोटे मोठे खड्डेमय आहेत. रस्त्याने दिवसा नीट चालता सुद्धा येत नाही. रस्ता नसल्याने वस्तीतील एखादा नागरिक आजारी पडल्यास त्याला चौघांच्या खांद्यावर, बाजेवर किंवा खाटेवर चिखलातून रस्ता पार करीत हॉस्पिटलला घेऊन जावे लागत आहे. या भागात रस्ते व नाली नसल्याने जागोजागी घरांसमोर सांडपाण्याचे घाण पाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे गल्लीत डेंगू, मलेरिया सारखे रुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. या भागातील नागरिकांना कुठलीही सुविधा मिळत नाही की, नगरपरिषद, नगरसेवक, लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत. त्यामुळे हा भाग म्हणजे नागरी समस्येचे माहेरघर बनला आहे. या भागातील रस्त्यांची आवकाळी पावसामुळे चिखलमय अवस्था आहे. पावसाळ्यात तर चालता येत नाही. गुडघाभर चिखल या रस्त्याने असतो. गल्लीत दोन शाळा प्राथमिक व माध्यमिक व दोन वस्तीगृह आहेत. शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना, लहान मुलांना, जेष्ठ नागरिकांना पावसाळ्यात चिखलातून मार्ग काढत चालावे लागते. लहान वयाचे बालक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, गंभीर आजाराने ग्रस्त रुग्ण यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. रस्त्याविना गल्लीत आठरापगड जाती धर्मातील लोक आहेत. यात विशेष करून दिन-दलित, दलित, पद दलित, मुस्लिम, बौद्ध, हिंदू, अल्पसंख्याक, समाज गोरगरीब मजूर, कामगार, बांधकाम मिस्री, बांधकाम कष्टकरी नागरिकांची व मतदारांची संख्या जास्त आहे. या नागरिकांची संख्या लक्षात घेता सिमेंट काँक्रेट रस्ता व नाली बांधकाम त्वरित करावे.या भागातील नागरिकांना सुविधे अभावी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सत्ताधारी नगरसेवक लक्ष देत नाहीत. त्यामुळे समस्या माडायच्या तरी कुठे असा सवाल असून चिखलात फसलेल्या नागरिकांना बाहेर काढा अशी आर्तहक्क निवेदनाद्वारे दिली आहे. रस्ता फारच चिखलमय, कच्च्या मातीचा व दलदलीचा असल्यामुळे पावसाळ्यात विद्यार्थ्यांना, लहान बालक, ज्येष्ठ नागरिक, वृयोवृध्द, रूग्णांना, कर्मचाऱ्यांना व या आबादीत राहणाऱ्या जनतेला व पालकांना विना पादात्राने चालत जावे लागते. त्यामुळे चिखलात चालता सुद्धा येत नाही. सदरील नगरामध्ये शाळा, वस्तीग्रह बरेच आहेत. या आबादीमध्ये एखादी व्यक्ती सक्त या गंभीरतेणे आजारी रूग्ण व सक्त आजार झाला. तर त्या व्यक्तीला किंवा शाळेतील विद्यार्थ्याला हॉस्पिटलला घेऊन जायचे म्हटले तर खांद्यावर नेल्याशिवाय कुठलाही पर्याय नाही. सदरील भाग काळया मातीचा असल्यामुळे पायदळी रस्त्यांचे चिखलाचे जास्त प्रमाणात होत असल्यामुळे कोणतीही वाहने येण्यासाठी नकार देतात. तरी मुख्याधिकारी नगरपरिषद व माजी गृहमंत्री संजय बनसोडे यांनी भगीरथ राजा नगर ते कमलेश्वर कन्या विद्यालय, गोविंदशेशीनिवास, शिवनगर, छत्रपती शिवाजीनगर पर्यंत सिमेंट काँक्रेट रोड व नाली बांधकाम त्वरीत करून दयावे. अन्यथा नगरपरिषद उदगीर कार्यालयावार सनदशीर मार्गाने, दि.१५ जून २०२३ पासून सर्व रहिवासी नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थिनी, अबालवृध्द, कामगार निषेध मोर्चा, अमरण उपोषण, बेमुदत उपोषण, धरणे आंदोलन, थिरडी आंदोलन, भजन आंदोलनसह विशेष म्हणजे येणाऱ्या नगरपरिषदेचे निवडणूकीवर बहिष्कार टाकणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषेदेचे शासननियुक्त अशासकीय सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे, एम.पी.सकनुरे, एन.पी.गित्ते, सुभाष सोनटक्के, पोलीस ठाणे अंमलदार शामसुंदर चोले, माजी सैनिक दत्ताञेय केंद्रे, एन.टी.चोले, सुर्यकांत केंद्रे, गंगाधर केंद्रे, नागनाथ केंद्रे, गणेश केंद्रे, शंकर केंद्रे, राम गुट्टे, गुणवंत मुंढे, राजकुमार धुमाळे, मनिषा पाटील, एन.एम.मठपती, अमोल मठपती, आकाश बोळेगावे, बालाजी जाधव, नारायण राठोड, देवानंद बेळसिंगे, विठ्ठल बेळसिंगे, राजकुमार आडे, शिवाजी मुंढे, गणेश बेल्लाळे, रवि तिडके, गिरीधर चिंमनदरे, व्यंकटराव पानचावरे, सैनिक बळीराम केंद्रे, सौ.पुजा बेळसिंगे, सौ.वंदना धुमाळे, संग्राम माने, सौ.सुलोचना बाबू लदाडे, अंकुश साळुंके, केंद्रे, तिडके, शिंदे, बेळसिंगे, धुमाळे, सोनटक्के, सुमनबाई राठोड यांच्यासह असंख्य रहिवांश्याच्या सहया आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात