तीवटग्याळ गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीची ओळख पटली,अकस्मात मृत्युची नोंद
उदगीर तालुक्यातील तीवटग्याळ येथील मानमोडी नदी जवळ एक व्यक्ती देविदास पाटील यांच्या शेतात अंजनीच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना 9 मे रोजी घडली या घटनेची माहिती माहिती उदगीर ग्रामीण पोलिसांना समजताच उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे बिट अंमलदार शिवप्रताप रंगवाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा करून सदरील मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते,गळफास घेवून आत्महत्या केलेली व्यक्ती शेषराव बाबना सगर वय 82 वर्ष राहणार उदगीर असे या मृत व्यक्तीचे नाव असून.तुकाराम शेषराव सगर यांनी दिलेल्या माहितीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यु 26/23 कलम 174 सीआरपीसी प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या आदेशाने पोलीस हेडकॉन्स्टेबल शिवप्रताप रंगवाळ हे करीत आहेत
0 Comments