Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

बनावट देशी दारूची अवैध वाहतूक करणारा ट्रक ग्रामीण पोलिसांनी पकडला,52 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

बनावट देशी दारूची अवैध वाहतूक करणारा ट्रक ग्रामीण पोलिसांनी पकडला,52 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

 

आतापर्यंतची ग्रामीण पोलिसांची सर्वात मोठी कारवाई

उदगीर:कर्नाटक राज्यातून रॉकेट नावाची बनावट अवैध देशी दारू एका ट्रक मधून उदगीर येथून जात असल्याची गुप्त माहिती डीबीचे पोलीस कर्मचारी सचिन नाडागुडे यांना एका गुप्तदारा मार्फत मिळाली होती.पोलीस कर्मचारी सचिन नाडागुडे यांनी पोलीस उपनिरीक्षक श्रीमंगल यांच्या पथकाला या संबंधी माहिती दिली असता पोलीस उपनिरीक्षक श्रीमंगल यांच्या पथकाने सापळा लावून लिंबोळीच्या पोत्याखाली रॉकेट नावाची बनावट देशी दारूची वाहतूक करणाऱ्या ट्रकला 8 जुलै रोजी कॅप्टन कृष्णकांत चौकाच्या जवळ ताब्यात घेतले.ट्रक क्रमांक KA 01 AE 6822 हा ट्रक  देशी दारूची बनावट वाहतूक करीत असताना आढळून आला, ट्रक मध्ये बनावट देशी दारूचे बॉक्स दिसू नये म्हणून देशी दारूच्या बॉक्स वरती लिंबोळीचे पोते टाकण्यात आले होते.लिंबोळीच्या पोत्याखाली मोठ्या प्रमाणात देशी दारूचे बॉक्स आढळून आले.ट्रक चालक ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात असून या कारवाईत पोलीस कर्मचारी तुळशीराम बरुरे, पोलीस कर्मचारी बनसोडे यांनी बनावट देशी दारूचे 870 बॉक्ससह 52 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला,या घटनेची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक रमेश चाटे व गणेश गोळे हे स्वतः उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे उपस्थित राहून गुन्हा नोंद होईपर्यंत ग्रामीण पोलिसांना सहकार्य केले. उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन अस्तित्वात आल्यापासून आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई ग्रामीण पोलिसांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात