आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना देवणी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षकास रंगेहाथ पकडले
देवणी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुजाहेद खुर्शीद शेख पोलीस उपनिरीक्षक यांनी आठ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकले.थोडक्यात माहिती अशी की.तक्रारदार यांना देवणी पोलीस स्टेशन येथे काळ्या मातीच्या चोरी प्रकरणात गुन्हा नोंद करणे बाबत केलेल्या तक्रारी अर्जात तक्रारदराला कुठलाही अडथळा न येऊ देता तक्रारदाराच्या बाजूने अर्ज निकाली काढल्याचा मोबदला तसेच भविष्यात देखील तक्रारदारास प्रभाकर शिंदे यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारीत मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी शेख यांनी सुरुवातीस सोन्याचे बिस्कीट आणि स्वतःसाठी तीन हजार रुपये, व साहेबासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली,तडजोड अंती स्वतः साठी तीन हजार रुपये व साहेबांसाठी पाच हजार रुपये पंचासमक्ष लाचेची मागणी केली.त्याचप्रमाणे थोड्याच वेळाने तक्रारदार शेख यांना उदगीर येथील गुलजार हॉटेल समोर रोडवर लाच मागणी केलेली रक्कम आठ हजार रुपये देण्यासाठी गेले असता शेख यांनी पंचा समक्ष लाचेची आठ हजार रुपयांची रक्कम स्वतः स्वीकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाचेच्या रक्कमेसह 5 जुलै रोजी रंगेहाथ पकडले उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.डॉ राजकुमार शिंदे पोलीस अधीक्षक अँटी कृरप्शन ब्युरो नांदेड,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक पंडित रेजितवाड,पोलीस निरीक्षक अन्वर मुजावार,यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली
0 Comments