Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

किनी यलादेवी येथील मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या आरोपींच्या वाढवणा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

किनी यलादेवी येथील मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या आरोपींच्या वाढवणा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

5 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

उदगीर:तालुक्यातील किनीयलादेवी येथे मोबाईल टॉवरवर लावण्यात आलेल्या बॅटऱ्या चोरणाऱ्या आरोपींला वाढवणा पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती असी की किनीयलादेवी येथे इंडस कंपनीच्या मोबाईल टॉवरसाठी विद्युत प्रवाह खंडित झाल्यावर लागणाऱ्या बॅकअपसाठी लावण्यात आलेल्या एक्साइड 600 AH कंपनीच्या 25 बॅटऱ्या प्रत्येकी किंमत 6000 हजार रुपये असा एकूण 1 लाख 50 हजार रुपये किंमतिच्या बॅटऱ्या व एम एच 28 एबी 4720 या क्रमांकाचा टाटा कंपनीचा छोटा हत्ती ज्यांची किंमत 4 लाख रुपये असा एकूण 5 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून घेऊन जात असताना 28 जुलै रात्री मिळून आला.असी फिर्याद अजय बळीराम कुलकर्णी यांनी वाढवणा पोलीस ठाण्यात दिल्यावरून आरोपी फेरोज मकबूल शेख,शेख अझहर सत्तार,सादिक महेबूब शेख,राहणार बरकत नगर लातूर,व राम बने राहणार अहमदपूर या चार आरोपीविरुद्ध वाढवणा पोलीस ठाण्यात गुरंन 177/23 कलम 379,34 भादवी प्रमाणे 28 जुलै रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड यांच्या आदेशाने पोलीस हेडकॉन्स्टेबल कलकते यांच्याकडे देण्यात आला आहे.कोंबिंग ऑपरेशनच्या वेळी आरोपी वाढवणा पाटी येथे पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

Post a Comment

0 Comments

जाहिरात