BREAKING बातमी.! चालत्या ट्रेनमधे गोळीबार, पोलीस जवानासह 4 प्रवाशी ठार...
मुंबई:राज्यात गोळीबारीची पुन्हा: एक मोठी घटना समोर आली असून, या घटनेत आरपीएफ एएसआयसह चार प्रवाशी ठार झाले आहेत. जयपूर-मुंबई रेल्वेत गोळीबार झाला आहे. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे. पालघरनजीक चालत्या ट्रेनमध्ये ही गोळीबाराची घटना घडली. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असल्याचे कळते.
त्यामुळे हे प्रकरण नेमके काय आहे, याबद्दलची उत्कंठा वाढली आहे. हा गोळीबार नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. प्राथमिक माहितीनुसार, जयपूर-मुंबई एक्स्प्रेस पालघर स्थानकाजवळून जात असताना हा प्रकार घडला. एक्स्प्रेस ट्रेनच्या बी-५ या बोगीमध्ये हा प्रकार घडला त्यानंतर ही एक्सप्रेस ट्रेन मीरारोड स्थानकात थांबवून मृत्यमुखी पडलेल्या चारही व्यक्तींचे मृतदेह शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले आहेत. याठिकाणी या मृतदेहांचे शवविच्छेदन आणि पुढील सोपस्कार पार पडतील. मात्र, हा गोळीबार नेमका कशामुळे झाला, याचा शोध पोलिसांकडून सुरु झाला आहे.जयपूर-मुंबई एक्स्प्रेस मुंबई सेंट्रल स्थानकात दाखल झाली. त्यानंतर लोहमार्ग पोलीस आणि इतर यंत्रणांना तातडीने एक्स्प्रेस ट्रेनचा ताबा घेतला आहे. पोलिसांकडून सध्या पुढील तपासाला सुरुवात झाली आहे. या तपासातून काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तर घटनेमागे वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात असून, सदर घटना आपआपासतील वादामुळे घडल्याची चर्चा अधिक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार; जयपूर एक्स्प्रेसमध्ये रेल्वे गुजरात राज्यातून पालघरमध्ये दाखल होताच गोळीबार झाला. या गोळीबारात चार जणांच्या मृत्यूसह काही प्रवासी जखमी आहेत. या घटनेची माहिती मिळतात जीआरपी पोलीस आणि आरपीएफ पोलीस घटनास्थळावर दाखल होऊन अधिक तपास करत आहेत. गोळीबार झाल्यानंतर एक्स्प्रेस मीरा-रोड दहिसर येथे थांबवण्यात आली होती. सध्या ही ट्रेन मुंबई सेंट्रल येथे दाखल झाली आहे. एक्सप्रेस ट्रेनचा नंबर 12957 असून गोळीबारानंतर रेल्वेत एकच गोंधळ उडाला. या गाडीतील कोच B-5 मध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. आरपीफ जवानाच्या आपआपसातील वाद झाल्यामुळे ही घटना घडली असल्याचे बोलले जात आहे. मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, आपल्या वरिष्ठाची हत्या केल्यानंतर आरपीएफ जवान चेतन कुमार थंड डोक्याने दुसर्या बोगीत गेला. त्याने अचानक तीन प्रवाशांना गोळ्या घातल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. रेल्वे पोलीस आणि आरपीएफ अधिकाऱ्यांच्या मदतीने मीरा रोड येथे आरोपीला पोलिसांनी पकडले. जयपूर एक्स्प्रेसमधून मृतदेह बाहेर काढून शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. आता पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात येत आहे. मृतांची (मृत प्रवासी) ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
0 Comments