राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे 15 लाखांचा मुद्देमाल केला जप्त
उदगीर:राज्य उत्पादन शुल्क नांदेड विभागाच्या विभागीय उपआयुक्त्या उषा वर्मा,व लातूर जिल्ह्याचे अधीक्षक केशव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर विभाग व उदगीर विभाग यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत 8 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट या कालावधीत उदगीर,निलंगा,लातूर,अहमदपूर,चाकूर,या ठिकाणी अवैध दारूची वाहतुक करणाऱ्या व अवैध विनापरवाना मद्य विक्री करणाऱ्या,तसेच हातभट्टी गावठी दारू विकणाऱ्यावर जिल्ह्यात 29 गुन्हे नोंदवून 39 आरोपींना अटक करण्यात आली या कारवाईत 855 लिटर देशी मद्य,व 52 लिटर बिअर दारू,105 लिटर विदेशी दारू,784 लिटर हातभट्टी दारू व 12 वाहने असा एकूण 15 लाख 84 हजार 615 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, सदरची कारवाई लातूरचे निरीक्षक आर एस कोतवाल,उदगीरचे निरीक्षक रमेश चाटे.दुय्यम निरीक्षक एल बी माटेकर,दुय्यम निरीक्षक ए.के. शिंदे,दुय्यम निरीक्षक स्वप्निल काळे,दुय्यम निरीक्षक ए.बी. जाधव,सहायक दुय्यम निरीक्षक गणेश गोले,सहायक दुय्यम निरीक्षक अनंत कारभारी, नीलेश गुणाले, जवान अनिरुद्ध देशपांडे, सुरेश काळे,श्रीकांत साळुंके,ज्योतिराम पवार, एस जी बागेलवाड,संतोष केंद्रे,एकनाथ फडणीस,पुंडलिक खडके,विक्रम परळीकर यांनी सहभाग नोंदवला.या कारवाईमुळे लातूर जिल्ह्यातील अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
0 Comments