दत्त नगरात चोरट्याने घर फोडले सोने चांदीच्या दागिन्यांसह 6 लाख 41 हजार रुपयांचा ऐवज केला लंपास
उदगीर:शहरातील दत्त नगर येथे चोरट्याने घर फोडून सोने चांदीच्या दागिन्यांसह मुद्देमाल लंपास केल्याची घटना 31 ऑगस्टच्या रात्री घडली.पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की दत्त नगर येथील अभय बाबुराव जाधव यांच्या घराचे अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश करून घरातील बेड रुम मध्ये लाकडी कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व लोखंडी कपाटात ठेवलेल्या साड्या व कपडे असे एकूण 6 लाख 41 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला असी फिर्याद अभय बाबुराव जाधव यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यावरून अज्ञात चोरट्यावर गुरंन 528/23 कलम 454,380,भादवी प्रमाणे 1 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक बनसोडे हे करीत आहेत.
0 Comments