Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

श्री.जयदीप सेवाभावी शिक्षण संस्था उदगीर तर्फे गोपाळ जोशी व छाया जोशी यांचा सत्कार

श्री.जयदीप  सेवाभावी शिक्षण संस्था उदगीर तर्फे गोपाळ जोशी व छाया जोशी यांचा सत्कार

 

 भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालय उदगीर येथील विद्यार्थी प्रिय, शिस्तप्रिय,माजी आदर्श संगीत कलाशिक्षक यांना त्यांच्या उत्कृष्ट सामाजिक,सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमाची दखल घेऊन नुकताच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई द्वारा दिला जाणारा राष्ट्रीय स्तरावरील पंडित विष्णू दिगंबर पलूसकर कला गौरव पुरस्कार देऊन नुकताच मुंबई येथे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई चे अध्यक्ष बाळासाहेब सूर्यवंशी, सचिव देवेंद्र कुलकर्णी,महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत गोपाळ जोशी व ओमकार संगीत विद्यालयाच्या संचालिका छाया जोशी यांना कला गौरव पुरस्कार देऊन मुंबई येथे सन्मानित करण्यात आल्याबद्दल श्री.जयदीप सेवाभावी शिक्षण संस्था उदगीर या संस्थेतर्फे व जवळे परिवारातर्फे त्यांचा शाल, भर आहेर,मखमलीची टोपी,विठ्ठल रुक्मिणी चे फोटो देऊन श्री. जयदीप सेवाभावी शिक्षण  संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जवळे, सचिव निवृत्ती जवळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे माजी प्रमुख कार्यवाह- ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष दीपक बलसुरकर,ज्योती कुलकर्णी,माधव खताळ, पत्रकार विक्रम हालकीकर,श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनिता जगताप, श्याम कुलकर्णी,सविता बारस्कर, केदार जोशी,विवेक डगवाले, स्वाती कुलकर्णी, समृद्धी कुलकर्णी,गुरुलिंग स्वामी,डॉ. अर्चना पाटील,संतोष सूर्यवंशी यांच्यासह उदगीर शहर व परिसरातील संगीत प्रेमी, ओमकार संगीत विद्यालयाचे आजी- माजी विद्यार्थी यांची यावेळी उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments

जाहिरात