Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

स्थानिक गुन्हे शाखेची तोंडार पाटी येथे कारवाई कार व देशी दारुसह 6 लाख 7 हजारांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई कार व देशी दारुसह 6 लाख 7 हजारांचा मुद्देमाल जप्त


लातूर:जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध धंद्यावर कारवाई करत देशी दारुची विनापरवाना वाहतूक करणारी स्विफ्ट डिझायर कारसह देशी दारू जप्त केली आहे.पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती असी की उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत एका कारमधून देशी दारूची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे उदगीर ते तोंडार पाटी जाणाऱ्या रोडवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 8 ऑगस्ट रोजी सापळा लावला असता अवैध देशी दारूची वाहतूक करणारा आरोपी गोविंद नामदेव बनसोडे यांना ताब्यात घेण्यात आले.आरोपिकडून एक स्विफ्ट डिझायर कार व देशी दारु असा एकूण 6 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमालासह ताब्यात घेवून ग्रामीण पोलिसांच्या देण्यात आले आहे.सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या  नेतृत्वात पथकातील पोलीस अंमलदार राहुल सोनकांबळे, माधव बिलापटे,नवनाथ हासबे, राजेश कंचे, राजाभाऊ मस्के,तुराब पठाण,संतोष खांडेकर, नितीन कठारे,मनोज खोसे,राहुल कांबळे,व केंद्रे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात