मोबाईल चोरल्याच्या कारणावरून एकाचा खून बनशेळकी रोड येथील घटना दोन तासात दोन आरोपींना पोलिसांनी केली अटक चौघांवर गुन्हा दाखल
उदगीर:शहरालगत असलेल्या राणी महल येथे एका व्यक्तीचा मोबाईल चोरल्याच्या कारणावरून खून केल्याची घटना घडली.सूत्रांनी दिलेली माहिती अशी की.मयत सुरेश चंदर कांबळे वय वर्ष ३८ वर्ष राहणार बनशेळकी रोड उदगीर या व्यक्तीचा मृतदेह 26 सप्टेंबर रोजी राणी महल येथे आढळून आला.या घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार,पोलीस उपनिरीक्षक सुमेध बनसोडे,पोलीस हेडकॉन्स्टेबल पडिले,पोलीस नाईक नाना शिंदे,पोलीस नाईक तिडोळे, पोलीस अमलदार पठाण,पोलीस अमलदार शेख,पोलीस अमलदार चेवले,पोलीस अमलदार देवडे,यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व प्रेत ताब्यात घेऊन सामान्य उपजिल्हा रुग्णालयात शवविछेदनासाठी दाखल करण्यात आले ग्रामीण पोलिसांनी खुनातील आरोपींचा शोध लावून खुनातील दोघा आरोपींना पोलिसांनी दोन तासाच्या आत अटक करून ताब्यात घेतले आहे मोबाईल चोरल्याच्या कारणावरून खून केल्याची फिर्याद मयताचा भाऊ रमेश चंदर कांबळे यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यावरून वहाब मोइनोद्दीन शेख,आदिल खादरी मेराज, महेश नागनाथ मुरगे,जुनेद रहीम शेख या चौघां आरोपीवर गुरन 591/23 कलम 302,34 भादवी प्रमाणे 26 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे,पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक देवकते हे करीत आहेत.
0 Comments