ग्रामविस्तार अधिकारी जयवंतराव कोणाळे यांची कृषी विस्तार अधिकारी पदी जळकोट येथे पदोन्नती
उदगीर:ग्रामविकास अधिकारी जयवंतराव शंकरराव कोणाळे यांची जळकोट येथे कृषी विस्तार अधिकारी पदी पदोन्नती देण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांनी नुकतेच आदेश दिले.ग्राम विकास अधिकारी जयवंतराव शंकरराव कोणाळे यांनी लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणच्या ग्राम पंचायतीमध्ये निस्वार्थीपणे चांगल्या प्रकारे आपली सेवा बजावली नियमाला धरून काम करणारे ग्राम विकास अधिकारी म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख आहे,आजपर्यंतच्या त्यांच्या कार्यकाळात कोणत्याही प्रकारचे आरोप सेवा बजावताना कामात हलगर्जीपणा,किंवा भ्रष्टाचार केल्याचा,नियम बाह्य कामे केल्याचा अशा कुठल्याही प्रकारचे आरोप नसलेले ग्रामविकास अधिकारी जयवंतराव शंकरराव कोणाळे यांची जळकोट पंचायत समिती येथे रिक्त पदावर कृषी विस्तार अधिकारी या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.ग्राम विकास अधिकारी जयवंतराव शंकरराव कोणाळे यांनी उदगीर तालुक्यातील नागलगाव येथे माजी सरपंच अश्विनीताई वाघे यांच्या काळात चांगली सेवा बजावली होती.ग्राम विकास अधिकारी जयवंतराव शंकरराव कोणाळे यांची पदोन्नती झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
0 Comments