Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

अग्निशमन दलाच्या जवानांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करीत असलेल्या शिक्षकांचे वाचवले प्राण

अग्निशमन दलाच्या जवानांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करीत असलेल्या शिक्षकांचे वाचवले प्राण

उदगीर:जळकोट रोड मणियार कॉम्प्लेक्सच्या बाजूला असलेल्या विहिरीत 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास एक शिक्षक उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करीत असल्याचे वाकिंगला जाणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास आले,या घटनेची तात्काळ माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना देण्यात आली अग्निशमन दलाच्या जवानांनी विलंब न करता साहित्यासह घटनास्थळी दाखल झाले विहरीत आत्महत्या करण्यासाठी उडी घेतलेल्या शिक्षकांला अग्निशमन दलाच्या जवानांनी विहिरीत उतरून विहिरीतून सुखरूप बाहेर काढून सदरील शिक्षकांचे प्राण वाचवले. सुखानंद रामराव बिरादार वय 54 वर्ष राहणार नावंदी ता उदगीर येथील असून त्यांच्यावर उदगीर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.रुग्णालयात ग्रामीणचे बिट जमादार, नामदेव व्यंकटराव धुळशेटे,पोलीस नाईक तिडोळे,गजानन नरसिंग जगताप व चार्ली पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांची कसून चौकशी करीत आहेत.अग्निशमन दलाचे जवान विशाल अलटे यांच्या पथकाने आत्महत्येचा प्रयत्न करीत असलेल्या शिक्षकांचे प्राण वाचवले

Post a Comment

0 Comments

जाहिरात