मलकापूर शिवारात रेल्वे रुळाजवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला, ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद
उदगीर:मलकापूर शिवारात टाईम पब्लिक स्कुलच्या पाठीमागे रेल्वे रुळाजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे,पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की मलकापूर शिवारात रेल्वे पटरी जवळ एक 35 वार्षिय पुरुष जातीचा मृतदेह असल्याची माहिती रेल्वे स्टेशन अधीक्षक बनीसिह मीना यांनी ग्रामीण पोलिसांना दिली मिळालेल्या माहितीच्या आधारे ग्रामीण पोलिसांनी 10 ऑक्टोबर रोजी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा करून सदरील मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात दाखल केले,स्टेशन अधीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यू नंबर 68/23 कलम 174 सीआरपीसी प्रमाणे अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या आदेशाने पोलीस नाईक केंद्रे यांच्याकडे देण्यात आला आहे
0 Comments