"ऑटो चालकास उच्च न्यायालयाचा दिलासा."
औरंगाबाद - छत्रपती संभाजी नगर: जळकोट पोलिसांनी दाखल केलेल्या 100 क्विंटल सोयाबीन चोरी च्या गुन्ह्यात मा. उच्च न्यायालयाचे मा.न्या. एस. जी. चपळगावकर यांनी जमीन देऊन दिलासा दिला आहे. थोडक्यात माहिती अशी कि फिर्यादी परमेश्वर डांगे यांनी जळकोट पोलिस ठण्यात त्याचा सलगडी गजानन वंजे याने 100 क्विंटल सोयाबीन गोडामातून चोरून नेऊन अडत बाजारात विकले, सदर विक्री करत असताना सलगड्याने आरोपी गणेश जोते याचा ऑटो भाड्याने घेतला होता, म्हणून सदर ऑटो चालक जेल मध्ये होता. तथापि मा. अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन दिला नाही, सदर नाराजीने आरोपीने मा. उच्च न्यायालयात ऍड. अजिंक्य रेड्डी यांच्या. मार्फत जामीन अर्ज दाखल केला, श्री रेड्डी यांनी अर्जदार आरोपी केवळ उदर निर्वाह करिता ऑटो चालवत होता, मुळ आरोपी फरार असून त्याने विक्री केलेले सर्व पैसे उचल घेतली असल्याबाबत आडत्या नि जबाब दिला आहे, तसेच स्वतः सालगडी हा त्याच्या मालकाचा माल विकत असल्याने आटोचालकास मुख्य आरोपी ने मालकाच्या परवानगी ने माल विकत असल्या बाबत चा भास निर्माण केल्या ची दाट शक्यता आहे अशी वस्तुस्थिती मा नयाल्यासमोर मांडली. सुनावणी अंति मा. उच्च न्यायालयाचे मा.न्या. एस. जी. चपळगावकर यांनी जमीन देऊन दिलासा दिला आहे. ऍडव्होकेट अजिंक्य रेड्डी, छत्रपती संभाजीनगर-औरंगाबाद. 9404333999.
0 Comments