उदगीरकरांना बौध्दिक मेजवानी देणार : क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे
उदगीर : शहरातील नगरपरिषदेच्या वतीने शारदोत्सवस आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन मागील ४ दिवसापासून सुरु आहेत यामुळे उदगीरकरांचे मनोरंजन होत असुन या शारदोत्सवाची सुरुवात १९९८ पासून केली जात आहे तीच परंपरा आजतागायत सुरु आहे.आई जगदंबेच्या चरणी घटस्थापना झाल्यावर हा कार्यक्रम आयोजीत करण्यात येतो. उदगीरकरांचा भौतिक विकासाबरोबरच
आता आपण बौध्दिक मेजवानी देणार असल्याचे मत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते नगर परिषद उदगीरच्या वतीने आयोजीत शारदोत्सव -२०२३ च्या आॅल इंडिया मुशायरा व कविसम्मेलनास प्रसंगी उद्धाटक म्हणून बोलत होते.
यावेळी ना.बनसोडे यांचे हस्ते दिप प्रज्वलित करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ नेते व्यंकटराव बेद्रे, ज्येष्ठ समाजसेविका लक्ष्मीअक्का पांढरे,
भाजपाचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत चामले, शहराध्यक्ष समीर शेख, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक विजय निटुरे, जळकोटचे नगरसेवक तात्या पाटील, धनंजय गुडसुरकर, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, बाजार समितीचे संचालक वसंत पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगटोल, प्रदिप जोंधळे, मौलाना नौशाद, प्रा.गौरव जेवळीकर,
जानी सय्यद, गणेश गायकवाड, प्रा.मल्लेश झुंगा स्वामी , फय्याज शेख, पाशा मिर्झा, अहमद सरवर, रामदास केदार, माजी नगरसेवक राजकुमार भालेराव,सनाउल्ला खान,अँड.महेश मळगे,आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.संजय बनसोडे यांनी, गत वर्षी शहरात आयोजीत केलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामुळे उदगीर शहराची ओळख जगाच्या नकाशावर गेली आणि तेंव्हापासुन आपल्या उदगीर शहराची साहित्य नगरी म्हणून एक नवी ओळख निर्माण झाली. साहित्य संमेलनानंतर वारकरी साहित्य संमेलन, उर्दू साहित्य संमेलन ही आपल्या शहरात पार पडले. उदगीरकरांना मनोरजंनाची मेजवानी देण्यासाठी आज शारदोत्सवामध्ये भारतातले नामवंत कवी या मुशाहरा मध्ये आले असुन
आपल्याला बौध्दिक मेजवानी सोबतच आपले मनोरंजनही होणार असल्याचे ना.बनसोडे यांनी सांगितले.
या मुशायरा कविसम्मेलनास नदीम फर्रुख, शकील आजमी मुंबई , सर्वेश अस्थाना लखनऊ, शांभवी सिंह प्रयागराज, महशर आफरीदी उत्तराखंड, डाॅ.सबा बलरामपुरी लखनऊ, सिराज सोलापुरी मुंबई आदी कवी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांनी केले. सुत्रसंचलन महारुद्र गालट यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. यावेळी शहरातील पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments