Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

तावरजा कॉलनीतील गॅस सिलेंडर स्फोटात जखमींचीक्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतली भेट

तावरजा कॉलनीतील गॅस सिलेंडर स्फोटात जखमींची
क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतली भेट

लातूर : येथील तावरजा कॉलनीत फुग्यात हवा भरणाऱ्या सिलेंडरचा 15 ऑक्टोबर रोजी  स्फोट झाला. यामध्ये फुगे विक्रेता ठार झाला, तसेच अकरा लहान मुले गंभीर जखमी झाले. यापैकी नऊ जखमींवर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी या जखमींची भेट घेवून त्यांच्या उपचाराबाबत माहिती घेतली. घटना घडल्यानंतर ना. बनसोडे यांनी तातडीने दूरध्वनीवरून जखमींच्या तब्येतीबाबत माहिती घेतली होती.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. समीर जोशी, वैद्यकीय अधीक्षक सचिन जाधव यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ना. बनसोडे यांनी स्फोटात जखमी झालेल्या मुलांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांच्या उपचाराबाबत माहिती घेतली. यावेळी त्यांनी जखमींच्या नातेवाईकांशी संवाद साधून उपचार, तसेच घटनेची माहिती जाणून घेतली.
यावेळी ज्येष्ठ नेते व्यंकटराव बेद्रे, उदगीर खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत चामले, यांच्यासह रुग्णाचे नातेवाईक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात