Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

संगिता नेत्रगावे-पाटील यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नारीरत्न राज्यस्तरीय पुरस्कार

संगिता नेत्रगावे-पाटील यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नारीरत्न राज्यस्तरीय पुरस्कार

उदगीर / प्रतिनिधी
येथील महात्मा पब्लिक इंग्लिश स्कुलच्या संस्थापिका प्राचार्य तथा स्वामी विवेकानंद ग्रामविकास प्रतिष्ठानच्या सचिव, महिला दक्षता समितीच्या सदस्या, सामाजिक कार्यकतीॅ सौ.संगिता दिपक नेत्रगावे-पाटील यांना अखिल भारतीय असंगठित कामगार व कर्मचारी एवमं इंदिरा गांधी राष्ट्रीय आँल एनजीओ असंघटित कामगार वेलफेअर असोसिएशन आँफ इंडिया, जिजामाता महिला मंडळ अतनूर, वसुंधरा महिला मंडळ उदगीरच्या वतीने दिला जाणारा सामाजिक क्षेत्रातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नारीरत्न राज्यस्तरीय पुरस्कार २०२३ हा जाहीर झाला आहे. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्रसन्ना देशमुख यांनी एका पत्राव्दारे निवड झाल्याचे कळविले आहे. लवकरच पुणे येथे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रीय मजदूर संघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष, कामगार नेते ॲड.सुनिलभाऊ शिंदे, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसचे राज्यसमन्वयक प्रसन्ना देशमुख, एस.जी.शिंदे-पाटील, सामाजिक कार्यकतीॅ प्रतिभा कांबळे मुंबई, महाराष्ट्र राज्य समाजकल्याण बोर्ड, मुंबईचे सेवानिवृत्त सचिव नरेश जेना, सचिव बी.एन.कांबळे यांच्या  हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याबद्दल संगिता नेत्रगावे-पाटील यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात