Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

चंचला हुगे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नारीरत्न राज्यस्तरीय पुरस्कार

चंचला हुगे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नारीरत्न राज्यस्तरीय पुरस्कार

उदगीर / प्रतिनिधी
येथील शिवशांती सेवाभावी संस्थेच्या सचिव तथा चंचल भारती चॕरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा एवमं महिला दक्षता समितीच्या सदस्या, सामाजिक कार्यकतीॅ सौ.चंचला शिवाजीराव हुगे यांना अखिल भारतीय असंगठित कामगार व कर्मचारी एवमं इंदिरा गांधी राष्ट्रीय आँल एनजीओ असंघटित कामगार वेलफेअर असोसिएशन आँफ इंडिया, जिजामाता महिला मंडळ अतनूर, वसुंधरा महिला मंडळ उदगीर च्या वतीने दिला जाणारा सामाजिक क्षेत्रातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नारीरत्न राज्यस्तरीय पुरस्कार २०२३ हा जाहीर झाला आहे. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्रसन्ना देशमुख यांनी एका पत्राव्दारे निवड झाल्याचे कळविले आहे. लवकरच पुणे येथे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रीय मजदूर संघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष, कामगार नेते ॲड.सुनिलभाऊ शिंदे, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसचे राज्यसमन्वयक प्रसन्ना देशमुख, एस.जी.शिंदे-पाटील, सामाजिक कार्यकतीॅ प्रतिभा कांबळे मुंबई, महाराष्ट्र राज्य समाजकल्याण बोर्ड, मुंबईचे सेवानिवृत्त सचिव नरेश जेना, सचिव बी.एन.कांबळे यांच्या  हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याबद्दल चंचला हुगे यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात