जमियत उलेमा-ए- हिंदच्या वतीने निवृत्ती सांगवे यांचा सत्कार
उदगीर:जमियत उलेमा-ए-हिंदच्या वतीने दलित पँथरचे उपाध्यक्ष निवृत्ती सांगवे यांचा सत्कार करण्यात आला, निवृत्ती सांगवे यांनी मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महिनाभर उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते,मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा लढा त्यांनी राज्यात पहिल्यांदा उदगीर येथून सुरू केला होता,आंदोलन ठिकाणी वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही भेट दिली होती, निवृत्ती सांगवे यांच्या आंदोलनस्थळी अनेक संघटना व अनेक पुढाऱ्यांनी भेटी दिल्या होत्या.मुस्लिम समाजासाठी दलित समाजातील एक माजी नगरसेवक आरक्षणाचा लढा उभा केला म्हणून जमियत उलेमा-ए-हिंदच्या वतीने पँथरचे प्रदेश उपाअध्यक्ष निवृत्ती सांगवे यांचा मौलाना अब्दुला सलीम चतुर्वेदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
0 Comments